भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद (द) च्या अंतर्गत आनंद बुद्धविहार हडको तुळजापूर येथे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न !

प्रतिनिधी : विजय अशोक बनसोडे, धाराशिव.
उस्मानाबाद : 24/3/2024 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आनंद बुद्धविहार हडको तुळजापूर येथे सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान मुख्य परीक्षक मा.अशोक केदारे मुंबई आणि राज्य संघटक बापूसाहेब गायकवाड, उस्मानाबाद दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष विजयमालाताई धावारे, जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न झाली. परीक्षेत जिल्ह्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद( दक्षिण) च्या वतीने आज सकाळी साडेअकरा ते पाच या वेळेमध्ये आनंद बुद्धविहार हडको तुळजापूर येथे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा उपरोक्त मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सकाळी ठिक अकरा वाजता तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प, दीप, धुपाने पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या यानंतर लगेच बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेला एकूण 16 परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला. तर यावेळी उस्मानाबाद दक्षिण महिला विभागाच्या उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे व जिल्ह्याचे संघटक सुकेशन ढेपे यांनी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. यानंतर जिल्हा हिशोबनिस देविदास कदम, महिला जिल्हा उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, राज्य संघटक बापूसाहेब गायकवाड, विजयमाला धावारे, राजश्रीताई कदम, विद्यानंद वाघमारे आणि सुकेशन ढेपे यांनी चार पॅनल करून परीक्षार्थींची तोंडी परीक्षा घेतली.
दुपारच्या सत्रात समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी अशोक केदारे, बापूसाहेब गायकवाड, राजश्रीताई कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. दक्षिण उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्ष विजयमालाताई धावारे यांनीही परीक्षार्थींना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले आभार प्रदर्शन जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे यांनी केले मानले.
यावेळी पर्यटन उपाध्यक्ष विश्वास पांडागळे, सचिव दत्ता माने, जि.संस्कार सचिव कुमार ढेपे, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे, परांडा तालुका सरचिटणीस ॲड. दिलीप निकाळजे, तुळजापूर तालुका अध्यक्ष चंदनशिवे, तालुका महिला उपाध्यक्ष लक्ष्मी कदम, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तालुका सरचिटणीस उमाजी गायकवाड, ता. पर्यटन सचिव स्वामीराव चंदनशिवे, तुळजापूर शहर अध्यक्ष अप्सरा ताई कदम, सचिव सुमित्रा ताई माने यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत