हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे ..! “

ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जात होता . आणि म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला .
चवदार तळ्याच्या काठी उभे असलेले मूर्तिमंत धैर्य आणि निष्ठा यांचे रूप असलेले ख्यातनाम विद्वान डॉ . बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना उगवत्या सूर्यासारखे भासले.
मुक्तीच्या मार्गावरील जनसमूहांचे ते नेतृत्व करणार होते .
स्वातंत्र्य मागून मिळत नसते , तर ते लढून मिळवावे लागते , असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला . आपल्या हाताच्या ओंजळीत त्यांनी हे जीवनामृत ( पाणी ) घेतले , त्यांचेच अनुकरण तेथे उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांनी केले. सत्याग्रहाचे खरे उद्दिष्ट असे होते की, पाणी हि निसर्गाची देणगी आहे आणि ते सर्वांना मिळालेच पाहिजे.
अशा प्रकारे त्यांची शिकवण आणि विचार प्रत्येकाने मूर्त स्वरुपात आणणे आवश्यक आहे. पाणी पिण्याच्या क्रियेतून त्यांना सर्वांना हे दाखवून द्यायचे होते, की अत्याचारांची परिसीमा होते, तेव्हा लहानातला लहान
जीवही बंड करू उठतो आणि अत्याचाराच्या बेड्या तोडून टाकतो.
“हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यकच आहे आणि याकरिता आपले आपसातले मतभेद , अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटीतपणे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न कारणे हेच आपले आजचे कार्य होय.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या
सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
समाज माध्यमातून साभार
सध्दम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.
सुधाकर ग्यानुजी पखाले.
9075233272
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत