महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

समता सैनिक दलाचा शताब्दी महोत्सव भव्यदिव्य करण्याकरिता १ लाख समता सैनिक तयार करावेत- डॉ. भीमराव आंबेडकर यांचा आदेश.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने १०० सैनिक बनवावे-एस के भंडारे

उमेश सुरवसे
धाराशिव दि.१८(प्रतिनिधी)-
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली चवदार तळ्याच्या सत्यागृह वेळी निर्माण केलेल्या समता सैनिक दलाची शताब्दी आपण शिवाजी पार्क सारख्या मैदानावर भव्य स्वरूपात करायची असून तो पर्यंत १लाख सैनिक तयार करावेत असे सांगून समता सैनिकानी आता आपली क्वालिटी दाखविणे गरजेचे असल्याचे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे दि १६/१७मार्च २०२४रोजी केंद्रीय शिक्षक शिबीर व समता फोर्स कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

प्रथमत : डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बौद्ध महासभा भिकखू संघ प्रमुख भन्ते बी संघपाल महाथेरो, समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे यांनी आदर्शांची पूजा केली. यावेळी आद. एस के भंडारे यांनी प्रास्ताविक करत असताना, “आता देशातील समता सैनिक दल संपूर्ण डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालू असून दलाच्या सन २०२७ च्या शताब्दी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती गतिमान करण्याकामी एक लाख सैनिक बनविण्यासाठी प्रत्येक सैनिक, अधिकारी व दि बुद्धिस्ट सोसायटीच्या कार्यकर्त्याने १०० सैनिक बनविणे आणि संविधान व आरक्षण विरोधक यांना मतदान होणार नाही ते सत्तेवर येणार नाही यासाठी काम करावे आणि संविधान बदलले तर डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुद्धिस्ट सोसायटी, समता सैनिक दल यांनी जर गरज पडली तर रस्त्यावरची लढाई साठी तयार राहावे असे सांगितले.

भन्ते बी संघपाल यांनी सैनिकांना त्रिसरण, पंचशील व आशीर्वाद दिला. या वेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे व मेजर जनरल प्रदीप कांबळे उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया व ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे उपस्थित होते.

केंद्रीय शिक्षक शिबिरात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कंपनी कमांडर व त्यावरील डिव्हिजन ऑफिसर, मेजर व भारतीय मिलिटरी सेवेतील माजी सैनिक व दलाचे वरिष्ठ पदाधिकारी असे १०७ सैनिक व अधिकारी या शिबीत्रात सहभागी झाले होते. समता फोर्स च्या निवडीसाठी दि १७मार्च २०२४ रोजी ४०वर्षा पर्यंतचे तब्बल ११० सैनिक /अधिकारी यांनी परीक्षा दिली त्यातून ८०जणांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया व शिक्षक शिबीर राष्ट्रीय उपाध्यक्ष / दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम व दादासाहेब भोसले, असिस्टंट लेफ्टनंट जनरल डी एम आचार्य व पी एस ढोबळे, मेजर जनरल उमेश बागुल व रमेश वाघमारे, मेजर राजाभाऊ आठवले, हेड क्वार्टर उपसचिव मोहन सावंत, मेजर रवींद्र इंगळे इत्यादीनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!