नोकरी च्या प्रतीक्षेत असलेल्या 52690 तरुणांची राज्य सरकार कडून क्रूर थट्टा..

शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश या विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.
जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातील 670 पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा 20 आणि 21 फेब्रुवारीला टीसीएस-आयकॉन संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे परिक्षा रद्द करण्यात आली आहे.
मृद व जलसंधारण विभागातील रिक्त पदासांठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा पेपर फुटला होता. या प्रकरणी काहींना अटक देखील झाली. 52 हजार 690 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे एका परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचे प्रकरण घडले असले तरी स्पर्धा परीक्षा ही निष्पक्ष, समान संधी उपलब्ध करणारी, संपूर्णत: पारदर्शक असणारी व परीक्षार्थींच्या मनात विश्वास निर्माण करणारी असावी. जेणेकरून उत्तमोतम उमेदवाराची निवड शासन सेवेत होऊ शकेल. एकूण परीक्षेविषयी तसेच त्याच्या कार्यपद्धती व पारदर्शकते विषयी विद्यार्थ्यांच्या मनात शंका नसावी म्हणून ही परीक्षा रद्द करण्याचे निर्णय घेऊन परीक्षा ही नव्याने कशी घ्यावी या बाबत लगेच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत