विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम संस्था चालकास अखेर बेड्या.

इंदापूर : रत्नदीपच्या फाउंडेशन चे विद्यार्थी मागील नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन करत होते. इतके दिवस फरार असलेला भास्कर मोरे याच्या अखेर भिगवन पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
संस्थेच्या रत्नदीप फार्मसी येथील विद्यार्थिनीचा विनय भंग केल्याचे प्रकरण उघड झाले होते तसेच वारंवार बऱ्याच विद्यार्थिनीं कडून तक्रारी येत होत्या, या पार्श्वभूमीवर भिगवण इंदापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने काल भास्कर मोरे यास भिगवन येथून अटक केली. त्याच्यावर हरीण पाळल्या प्रकरणी वन विभागाने ही गुन्हा नोंद केला आहे.
आपल्या अनैतिक वासनेपोटी प्रतिभावान मुलींच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या नराधम संस्था चालकास कठोर शिक्षा व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी मागणी होत आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठांच्या समितीने रत्नदीप मेडिकल कॉलेजचे सहा लॅब सील केले असून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून अभ्यासक्रम व परीक्षा बाबत चर्चा केली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत