समता सैनिक दल.

समता दलाची स्थापना का झाली याचा संपूर्ण इतिहास खास आपल्यासाठी
-अशोक तुळशीराम भवरे
महाडचा सत्याग्रह यशस्वी झाला आणि सामाजिक चळवळीला संरक्षण देण्याची जबाबदारी समता सैनिक दलावर आली.
- सैनिक दलाची उद्दिष्ट्ये
१). विषमतेविरुध्द लढणे व समता स्थापन करणे.
२). आंबेडकरी जनतेचे संरक्षण करणे.
३). वंश धर्म जात पात लिंगभेद या वर्गावर आधारित विषमता नष्ट करणे.
४). देशात व समाजात समता स्थापन करणे.
५). समता स्वातंत्र्य बंधुत्व या पायावर नवीन समाज रचना करणे.
६). समता सैनिक दलाची पोलादी एकजूट करणे.
७). चळवळीच्या नेत्यांचे संरक्षण करणे. चळवळीचे कवच बनून राहणे.
८) आंबेडकरी परिवाराचे संरक्षण करणे. ( संस्थांचे संरक्षण करणे. )
९) व्यसन मुक्त समाज निर्माण करणे.
१०) संकट समयी सेवेस तत्पर राहणे.
११) तरूणांची पोलादी ताकद निर्माण करणे.
** नियम
१) समता सैनिक दलाची घटना १९४५ साली तयार करण्यात आली.
२) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे चौथे राष्ट्रीय बौद्ध अधिवेशनामध्ये संस्थेच्या संरक्षण विभागाची जबाबदारी समता सैनिक दलाला दिलेली आहे.
३) समता सैनिक दलाची नियमावली ( सुधारित ) बनवून संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आद. मीराताई आंबेडकरांनी दिनांक २७ डिसेंबर १९९८ रोजी मान्यता दिलेली आहे.
४) दलाचा ध्वज दिनांक ६ मे १९४५ साली निर्माण करण्यात आला.
५) दलाच्या ध्वजावर अशोक चक्र राहिल त्यामध्ये सोळा अरे असतील.
६) मध्यभागी S.S.D. अशी अक्षरे असतील.
७) खालच्या साईट किनार्याला B.S.I. अशी अक्षरे असतील.
८) समता सैनिक दल हे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या अधिपत्याखाली राहील. समता सैनिक दलाला स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही.
समता सैन्य दलाचे ऐतिहासिक कार्य
१) दिनांक २० मार्च १९२० महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह
२) सन १९३० ते १९३५ काळाराम मंदिर सत्याग्रह ( दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. )
३). सन १९३२ साली गोलमेज परिषदे वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात येणार होते तेव्हा त्यांना काही लोक काळे झेंडे दाखवणार होते त्यावेळी दलाने जय्यत तयारी केली आणि मुंबई बंदरावर एम. एम.ससाळेकर यांच्या मार्गदर्शनाने विरोधकांना चोख उत्तर दिले.
४) १९४२ नागपूर येथे शेड्युल कास्ट फेडरेशनचे अधिवेशनाची व्यवस्था केली.
५) कानपूर येथील दुसरी परिषद यशस्वी केली.
६) दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा पार पडला. ७,००,००० लाख बौध्दांनी बौद्ध धर्म स्वीकारला या सोहळ्याचे व्यवस्था व संरक्षण समता सैनिक दलानी केले.
सभासदत्व
१) संस्थेचे तथा समता सैनिक दलाचे ध्येय व उद्दिष्ट मान्य करणार्या कोणत्याही १८ वर्षावरील बौद्ध नागरिकास सभासद होता येईल.
२) शिक्षण – समता सैनिक दलामध्ये सहभागी होणाऱ्या सभासदास शिक्षण / प्रशिक्षण हे बौद्धिक, धार्मिक, नैतिक, शारीरिक, प्रामुख्याने लष्करी स्वरूपाचे दिले जाईल.
@* समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्यक्रम*
१) १ जानेवारी भीमा कोरेगाव, पुणे, महाराष्ट्र.
२) २० मार्च, सत्याग्रह दिन, महाड चवदार तळे, जिल्हा रायगड, महाराष्ट्र
३) १३ ऑक्टोबर, धर्मांतर घोषणा दिन, येवला, मुक्ती भुमी नाशिक, महाराष्ट्र,
४) ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन, दादर चैत्यभूमी, मुंबई, महाराष्ट्र,
५) धम्मदीक्षा वर्धापन दिन, अशोका विजयादशमी, दीक्षाभूमी, नागपुर, महाराष्ट्र,
६) ७ फेब्रुवारी, माता रमाई जयंती, वनंद, रत्नागिरी, महाराष्ट्र,
राष्ट्रीय कार्यक्रमाला संपूर्ण देशातील समता सैनिक दलाचे सैनिक व अधिकारी यांचा एकत्रित कार्यक्रम असेल. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील.
समता सैनिक दलास आपण सर्वांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे.
सर्वांचे मंगल होवो !!!
नमोबुद्धाय ! सविनय जयभिम !!
आपला धम्मबंधू !
आयु. राज जाधव
संकलन व संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संविधान प्रचारक/प्रसारक.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत