१६-१७ मार्च ला विदर्भात पावसाची शक्यता.

गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे चढ-उतार पाहता राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर राहील असा अंदाज आहे.
अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे दिल्लीत देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये चक्राकार वाऱ्यासह वादळाची शक्यता सांगितले आहे महाराष्ट्र राज्यातून थंडी गायब झालेली असली तरी उकाड्यात मात्र वाढ होत आहे. विदर्भ आणि कोकणापर्यंत तापमान वाढ झाली आहे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमान वाढ आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये तापमान वाढत आहे मार्चच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती आहे तर एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत