भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाल संस्कार शिबिर संपन्न.

बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून घेण्यात आलेले दहा दिवसीय बालसंस्कार शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारोपाच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे, जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे, महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, जिल्हा संघटक विजय बनसोडे, संस्कार प्रमुख कुमार ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तालुका महासचिव उमाजी गायकवाड, तालुका संस्कार प्रमुख आदिनाथ सरवदे, संघटक राजाराम बनसोडे, बाबासाहेब कांबळे, पर्यटन प्रमुख स्वामीराव चंदनशिवे या मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे पूजन धूप दीप प्रज्वलित करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सुरुवात झाली.
सुरुवातीस त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले .यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांनी दहा दिवसांमध्ये धम्माचे घेतलेले शिक्षण यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले निश्चितपणे पुढील काळामध्ये आम्हाला भारतीय बौद्ध महासभेने या संस्कार शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलेले ज्ञान आम्हाला आमच्या आयुष्यात उपयोगी पडेल अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित बाल विद्यार्थी यांना मिठाई वाटप करण्यात आली. शेवटी सरणत गाथा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत