शेतकरी बांधव पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत..

दिल्ली : शेतीमालाला किमान आधारभूत किंमत हमी देण्याचा कायदा तात्काळ लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज दिल्ली येथे आंदोलन करण्याचा पावित्रा घेतलेला आहे. परंतु राजधानी दिल्लीमध्ये येण्यास बंदी घातली असल्याने शेतकऱ्यांना राजधानी बाहेरच अडवण्याचे शर्थीचे प्रयत्न केंद्र सरकारने केलेले दिसत आहेत.
या निमित्ताने गृहमंत्री प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानाचे सुरक्षा वाढवण्यात आली असून दिल्लीमध्ये सगळीकडे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारने हरेक पद्धतीने शेतकऱ्यांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असतांना सुद्धा लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव रस्त्यावर उतरन्याचा अंदाज आहे. पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे येण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत