महाराष्ट्रमुख्यपानविदर्भसामाजिक / सांस्कृतिक

फसवणूक आणि आत्महत्या प्रकरणात उरळ पोलिसांचा आरोपींना अभय, आरोपी सोडून मुलगा गमवलेल्या कुटुंबाला दिला जातो त्रास ! – वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभी.

शेती व्यवहारात जवळ जवळ ३६ लाख रुपयांनी फसवणूक झालेल्या संतोष बोरकर यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.ह्या प्रकरणात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सहा आरोपींची नावे असताना १९ फेब्रुवारी पासून उरळ पोलिसांनी एकही आरोपी अटक केला नाही.ह्या बाबत मुलगा गमवलेल्या सहदेव बोरकर ह्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ह्यांचे कडे तक्रार केली आहे.ह्या मुळे पित्त खवळलेल्या ठाणेदार ढोले यांनी आज फिर्यादी कुटुंबाला त्यांचे पासबुक आणि शेती मधील उत्पन्न ह्याचे पुरावे सादर करण्याचे फरमान बजावले आहे, त्यामुळे उरळ पोलीस स्टेशन पीडित कुटुंबावर दादागिरी करीत असल्याने वंचित बहुजन आघाडीने पीडित बोरकर कुटुंबाचे बाजूने उभे राहण्याचा निर्धार केला आहे.

संतोष उर्फ पिंटु सहदेव बोरकर याने आत्महत्या प्रकरणी पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, उरळ यांनी सदर तकार दाखल करून घेवून सहा आरोपी विरुध्द अप.क. 86/2024 नुसार त्याच दिवशी गुन्हा देखील नोंदविला होता. परंतू सदर अपराधामध्ये फसवणुकीचा गुन्हा समाविष्ट करण्यात आला नाही.असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे.

वरील प्रमाणे अपराध नोंदवून देखील सुध्दा आजपर्यंत आरोपींना अटक झालेली नसून आरोपी समाजात मुक्तपणे वावरत आहेत. आरोपींनी आर्थीक फसवणुक केल्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली आहे. परंतू पोलिस अधिकारी, उरळ यांनी आजपर्यत अटक केलेली नाही. त्यामूळे काल जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग ह्याची भेट घेवून बोरकर ह्यांनी तक्रार दाखल केली.जिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांनी पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, उरळ, जि. अकोला यांना तत्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेशीत करून तपास स्वतः ठाणेदार ह्यांनी करावा अशी तंबी दिली.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांनी देखील लक्ष घालण्याचे सूचित केले.वरिष्ठ अधिकारी ह्याचे पुढे आपली नाचक्की झाल्याने ठाणेदार ढोले ह्यांनी आज सहदेव बोरकर ह्यांना त्याचे कुटुंबाचे पासबुक आणि शेती उत्पन्न पुरावे सादर करण्याचे फरमान काढले.आरोपी विरुद्ध कार्यवाही करण्या ऐवजी फिर्यादीला वेठीस धरून पोलीस आरोपींना जामीन मिळविण्यासाठी मदत करीत आहेत.ह्याचा वंचित बहुजन आघाडी निषेध करीत असून उरळ पोलिसांनी दादागिरी करू नये अन्यथा पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!