मनुवाद्यांची मूठमाती मातंग समाजाच्याच हातून होईल:- प्रबुद्ध साठे


मातंग, चर्मकार, होलार इत्यादी बहुजनांनी बौद्ध धम्म स्वीकारुन घरवापसी करावी :- प्रबुद्ध साठे धाराशिव–(लोहारा) बौद्ध धम्म हेच खरे बहुजन समाजाचे आस्तित्व व ओळख असून पूर्वाश्रमीचे आम्ही सारे बौद्धच होतो, बौद्ध भारत हाच खरा भारताचा चेहरा असून किमान अनुसूचित जातीमध्ये असणारा जातीभेद नष्ट होवून त्यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा, यासाठी मातंग, चर्मकार, होलार इत्यादी बहुजनांनी बौद्ध धम्म स्वीकारुन घरवापसी करावी असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांनी केले.
ते धाराशिव मधील धानोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आंबेडकर, संत गाडगे महाराज, संत रविदास, संत सेवालाल व कसबे तडवळे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या महार मातंग वतनदार परिषदेच्या वर्धापनदिन निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते, समरतामंच, RSS च्या , प्रस्थापितांच्या दलाल, चमचे, चाकरीच्या गड्याच्या नादी लागून मातंग समाजाने आणखी स्वतः चे वाटोळे करून घेवू नये तर मातंग समाजातील आंबेडकरवादी लोकांच्या नेतृत्वाखाली मानवतावादी चळवळीत सामील व्हावे.
जात ही अभिमान बाळगणारी बाब नसून, जात अस्मिता हा आत्मघात आहे तर जातीअंताची लढा देणे हा आत्मसन्मान आहे, जातीअंतातून माणूस, समाज, राष्ट्र निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, बौद्ध धम्मच मानवी जगाच्या सुखी व कल्याणाचा विश्वास, शाश्वती आहे, देव धर्म, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, जत्रा यात्रा यावर खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी व भवितव्यावर खर्च करा असे ही अवाहन प्रबुद्ध साठे यांनी केले, याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तानाजी माटे, छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड, सरपंच प्रवीण थोरात, सोमनाथ गायकवाड, श्रीरंग सरवदे, राजश्री कांबळे सरपंचखेड, बळीराम बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत