आंबेडकरी चळवळीत महापुरुषवाद !

आंबेडकर चळवळीत महापुरुषवाद आणायचे ध्येय !
आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जातीच्या समूहातील छोट्या छोट्या जाती-जमातीतील महापुरुषांना क्रांतिकारक लोकांना आणि क्रांतिवीरांनात्या त्या समाजाला माहित करून दिले याचा उद्देश हा होता की लोक दैविक आणि ईश्वरी शक्तीकडे न जाता माणसातील चांगले विचारांकडे यावे व आंबेडकरी विचारात व आंबेडकरी चळवळीत त्यांचा सहभाग व्हावा जेणेकरून त्या लोकांना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार त्यांच्या विकासाचे साधन त्यांची उन्नती ही कशी होईल हे कळेल !
आंबेडकर चळवळीत महापुरुषवाद आल्याने काय झाले ?
आंबेडकर चळवळीत महापुरुषवाद आल्यामुळे झाले असे की ज्या लोकांना त्यांच्या जातीतले क्रांतिकारक क्रांतिवीर माहित नव्हते ते माहीत झाले आता त्यांनी त्या क्रांतिवीरांची क्रांतिकारक लोकांची पूजा पूजा चालू केली त्या क्रांतीकारक क्रांतिवीर माणसं हे स्वातंत्र्याच्या चळवळीत लढले होते या शोषित वंचित घटकांसाठी अस्पृश्यांसाठी इतर मागासवर्गाच्या हक्का व अधिकारासाठी बाबासाहेब लढले परंतु या महापुरुषवादाच्या गर्दीत हे वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक बाबासाहेबांना साईटला ठेवून या वेगवेगळ्या क्रांतिकारक क्रांतिवीर लोकांची पूजा करत बसले ज्यांची कोणतीच विचारधारा नाही ना त्यांची कोणती चळवळ आहे, ना या क्रांतिकारकांनी या लोकांसाठी ना कोणते लढे दिले, ना कोणत्या चळवळी उभारल्या तरी लोकांनी बाबासाहेबांना सोडून यांचे गुणगान गात राहिले ज्या बाबासाहेबांच्या चळवळीने या लोकांना सर्व काही दिला आहे आणि हे आज त्यांनाच डावलून महापुरुषांचा स्तोम माजवत आहे !
महापुरुषवाद आंबेडकरी चळवळीत फायद्याचा की तोट्याचा !
बौद्ध धर्माच्या बाबतीत इतिहास भारतात झाला तो प्रकार आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत व्हायला नको बौद्ध धर्माच्या महायानियांमुळे धर्मात अलोकितेश्वर, महाकाल आणि वज्रयोगिनी अशा देवता तयार करण्यात आल्या पुढे चालून काळाच्या ओघात याच देवता अनुक्रमे विष्णू, शिव आणि महाकाली झाल्या, भारतातील लोक त्यांचा शास्ता भगवान बुद्ध यांना विसरून गेले आणि या छोट्या देवतांना पुजत बसले, हेच आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत घडू नये लोक फक्त महापुरुषांना पूजत बसू नये आंबेडकरी चळवळीची विचारधारा आंबेडकरवाद बाबासाहेबांचे विचार, आंबेडकरी चळवळीचे ध्येय काय आहे ते प्राप्त करण्यासाठी बाबासाहेबांचे विचारांवर चालणे गरजेचे आहे ! त्यातच स्त्रिया वंचित शोषित घटक आणि इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक यांचे कल्याण आहे व देशाचे हित आहे !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत