महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठविदर्भ
सांभाळ ही तुझी लेकरं, पुण्य समजती पापाला..
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
सांभाळ ही तुझी लेकरं पुण्य समजती पापाला
ही धोंड्याला म्हणती देवता, भगत धुंडती तया जोगता
स्वत:च देती त्यास योग्यता, देव म्हणूनी कुणी न भजावे
फुका शेंदरी दगडाला
कुणी न रहावे खुळे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी
ह्यासाठी ही झिजते वाणी, मी जातीचा धोबी देवा
धुवीन कपडा मळलेला
हेच मागणे तुला श्रीहरी, घाम गाळी त्या मिळो भाकरी
कुठेच कोणी नको भिकारी, कुणी कुणाचा नको रिणकरी
कुणी न विटो नर जन्माला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत