मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

“शालेय जीवनापासून आपल्या पाल्यास शिस्त लावण्यासाठी पालकाची आणि शाळेची भूमिका महत्वाची ! “डॉ. लेफ्टनंट कर्नल मधुकर कांबळे.

बीड : सोमवार 19.2.2024. शालेय जीवनापासुन आपल्या पाल्यांना शिस्त लावण्यासाठी पालक आणि शाळेची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी.प.प्रा.शा. दिपेवडगाव ता. केज जी.बीड येथे दि.१९ फेब्रु २०२४ रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक यांना संबोधित करतेवेळी मा.डॉ. लेफ्टनंट कर्नल मधुकर कांबळे म्हणाले.

दरवषी प्रमाणे याही वर्षी गेल्या ९ वर्षापासून शिवजयंती आणि कै.हरिभाऊ कांबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी इयत्ता ७ वी वर्गाची बालसभा, इयत्ता ४ थी वर्गाची इतिहास विषयावर आधारित प्रश्न मंजुषा, परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवराची प्रत्यक्ष भेट घेऊन मुलाखत, विविध शालेय कार्यक्रमांचे अहवाल लेखन, नृत्य स्पर्धा, आदींचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील कु. आश्विनी गुळभिले हिची तलाठी परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यापक बाळासाहेब चव्हाण, अरविंद कांबळे, श्रीमती प्रतिभा वाघचौरे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी दिपे वडगाव येथील सरपंच मा.दिपक गुळभिले, उपसरपंच गोविंद चव्हाण, गोविंद गुळभिले तर मा. पशुसंवर्धन सहआयुक्त विठ्ठल कांबळे, जि.प. आंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा पाथरी जि. परभणी येथील संजय ऊजगरे, श्रीमती कमल संजय ऊजगरे, श्रीमती मंजूशा मधुकर कांबळे, श्रीमती छाया विठ्ठल कांबळे, सुमन झुंबर खरात चाकन मेदनकरवाडी पुणे, मा.पि.एस. आय. विष्णु रोडे, अमर इंडस्ट्रीज छ. संभाजी नगर, अमर वडगावकर आदींच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना लेखन वाचन साहित्य, स्पर्धा मधील निवडलेल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप गेल्या मागील ९ वर्षांपासून कै.हरिभाऊ कांबळे यांच्या स्मरणार्थ करण्यात येते . यावेळी श्रीमती कमल उजगरे, सुमन खरात, मा विठ्ठल कांबळे, यांनी आपली मनोगत व्यक्त केली, सूत्रसंचालन आणि नियोजन बाळासाहेब चव्हाण यांनी केले तर आभार संजय उजगरे यांनी मानले यावेळी शाळेतील माजी विद्यार्थी, पालक, महिला , शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक , ग्रामपंचायत सदस्य आदीच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!