जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस उपोषणमागे घेण्याची मुख्यमंत्रीची विनंती
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू हाेते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती खूपच ढासळली आहे. यामुळे सरकारविरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात तीव्र निदर्शने केली जात आहेत.
मराठा आंदोलकांनी नांदेड, हिंगोली, बीड, जालना, बुलढाणा परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, अन्यथा जेलभरो आंदोलन करू, अशा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महामंडळाने अनेक जिल्ह्यातील एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद राहील, असं महामंडळाकडून सांगण्यात आलंय. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असून बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. यासोबत चक्काजाम आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास होकार दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही, तो होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत