महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

रेवडी बहाद्दर कोण आहे? –जगदीश काबरे

निवडणूक प्रचाराच्या भाषणांमधून आणि जाहीरनाम्यातून अन्य पक्षांनी दिलेली आश्वासने म्हणजे रेवड्या आणि मोदींनी दिलेली आश्वासने म्हणजे रेवड्या नसून गरिबाबद्दलची त्यांना वाटणारी कणव असे समजण्याचा हा काळ आहे. पण सामान्य माणसे या सगळ्या गोष्टी म्हणजे निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी रेवड्यांचे केलेले वाटप असेच समजतात. जाहीरनाम्यातील किंवा निवडणूक प्रचाराच्या भाषणातील अनेक आश्वासने खरे तर हवेतील रेवड्याच असतात असा आजवरचा अनुभव आहे. पण पंतप्रधान मोदींनी दिलेले 81कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य वाटपाचे आश्वासन मात्र खरे ठरते. कारण सत्ता त्यांच्या हातात आहे. आणि येनकेन प्रकरेण त्यांना प्रत्येक निवडणूक जिंकायचीच असते. पण जनता त्यांना रेवडी बहाद्दर समजते त्याचे काय?

पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षे त्यांच्या कर्तृत्वामुळे 81 कोटी जनता गरीबच राहणार असे ठामपणे गृहीत धरून त्यांना फुकट धान्य देण्याची लालूच दाखवली आहे. त्यापेक्षा रोजगार निर्मिती केली असती तर याच जनतेची उत्पादनक्षमता वापरता आली असती आणि देशाला पुढे नेता आले असते. त्यांची बेरोजगारी हटवण्याचा विचार न करता विश्वगुरू लाभार्थीना आपल्यावर अवलंबुन ठेवून लाचार करत निवडणुक प्रचारी भाषणात मतांची भीक मागत फिरत आहेत. मग त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या विकासाच्या फक्त गप्पाच होत्या की काय? नागरिकांचे दरडोई उत्पन्न न वाढवता हे म्हणे, पुढील तीन वर्षात देशाची इकॉनॉमी पाच ट्रिलियन डॉलरची करणार आहेत! यावर भक्तगणंग सोडून कुणाचा विश्वास बसेल काय?

दुसरे म्हणजे सरकारला दरवर्षी यासाठी जवळजवळ दोन लाख कोटी रुपये खर्च येतो. कारण सरकारला गरिबांना धान्य जरी फुकट पुरवायचे असले तरी ते धान्य विकत घ्यावे लागते. मग सरकारने हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यापेक्षा देशातील अनेक देवालयात अब्जो रुपयाची संपत्ती अशीच पडून आहे. सरकारने देवालयातील ट्रस्टीना आवाहन करून त्या संपत्तीचा उपयोग का करू नये? आपल्या देशातील जनता स्वतःला धार्मिक म्हणवते आणि परोपकार करणे हा धर्माचा भाग आहे असे समजते तर मग या श्रीमंत देवालयाच्या ट्रस्टींनी दक्षिणा म्हणून जमा झालेल्या अब्जो रुपयांतील काही रुपयांचे वाटप या कामी सरकारला मोफत धान्य योजनेसाठी येणारा खर्च म्हणून का करू नये? आपल्याकडे जवळजवळ सर्व देवालयांमध्ये देवळातील पुजारी तुन्नील तनु, गले लठ्ठ आणि देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांचे पोट खपाटीला गेलेले, असे दृश्य सर्रास दिसते. पण हे खपाटीला पोट गेलेले भाविकच देवाला भरभरून दक्षिणा देत असतात. मग त्यांचीच भूक भागवण्यासाठी या देवालयाने थोडे तरी उदार होऊन सरकारला मदत करायला काय हरकत आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!