महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

माता रमाईच्या जयंतीनिमित्त…यश भालेराव.

रमाई
एक नाव नाही…
रमाई एक संस्कार आहे
रमाई एक त्याग आहे…
रमाई एक कर्तव्य आणि एक जबाबदारी आहे…
रमाई विषयी बोलताना किंवा रमाई आत्मसात करताना खुप बोलावेसे वाटते
पण त्यातील रमाईचा आवडता गुण म्हणजे
आपल्या पतीला त्यांचे समाजहिताचे काम करण्यास कधी ही आडवले नाही.
त्यांना समाजहिताच्या कामाकरीता कधीही कोणतेही बंधन टाकले नाही.
घराचा डौलारा सर्व सांभाळुन रमाई मोठ्या धैर्याने लढत होत्या,
मग बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात गेले असताना ही रमाईने मात्र बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही काहीही व्यत्यय येऊ दिले नाही.
उलट परदेशात बाबासाहेब शिक्षण घेत असताना रमाई बाबासाहेबांना थोडे थोडे पैसे पाठवत असे.रमाईला माहित होते बाबासाहेबांकडे पुरेसे पैसे नव्हते कि बाबासाहेबांना जी स्काँलरशिप मिळत होती ती कधी कधी ती स्काँलरशिप वेळेवर मिळत नव्हती त्यामुळे बाबासाहेब उपाशी राहत असे किंवा एकवेळीच जेवण करायचे .रमाईला मात्र बाबासाहेबांच्या या वेदना सहन होत नव्हत्या रमाई घर संसार सांभाळुन जादाचे कष्ट करुन बाबासाहेबांना पैसे पाठवायची…
(बाबासाहेब ज्या वेळी लंडन वरुन बोटने परत येत असताना सर्व जन बाबासाहेबांना घेण्यासाठी समुद्र किनारी जमले असता. रमाई मात्र कार्यकर्त्यांना पुढे जाऊन देत होत्या . रमाई स्वतः पाठीमागे राहिल्या…. सर्वांनी बाबासाहेंबाची भेट घेतल्यावर रमाई यांनी बाबासाहेबाना भेटल्या
आणि त्याही वेळी रमाईकडे नेसल्यासाठी चांगली साडी नव्हती पण रमाईने तिच्या साडीचा विचार केला नाही पण बाबासाहेबांसाना शिक्षणासाठी पैसे पाठवणारी रमाई होती.
(पण आजकाल ची परिस्थीती अशी आहे कि कोणता सण असो कि अन्य काही मला साडी पाहिजे तुम्हाला काही नाही घ्यायचे तर नका घेऊ .
तसेच घरात जर स्त्री कमावती असती तर तिचे पैसे किंवा तिचा पगार हा तिचाच असतो, तिच्या नवरयाचा पगार मात्र घरखर्च आणि संसारासाठी असतो.
म्हणुन म्हटले कि रमाई हे नाव नाही तर रमाई एक संस्कार आहे .. रमाई एक कर्तव्ये आणि एक जबाबदारी आहे.

मोठी भावजय लक्ष्मी बाई तिच्या पतीचे निधन झाल्यावर लक्ष्मीबाई आणि रमाई या जाऊबाई अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहत होत्या.
याची कधी एकमेकीसोबत कधी भांडणे झाली नाही.
(पण आजकाल आपल्याकडे कोणी नातेवाईक जर आले तर ते 1 दिवस सहन केले जाते पण पाच सात दिवस जर ते राहिले तर घरात कुरकुर चालु होती.आणि कायमची जर राहिली तर खुपच अवघड होत असते.
आजच्या या शहरीकरणामध्ये प्रत्येकीला आपण आणि आपला नवरा आणि मुले बस्स ईतकेच पाहिजे
नवरयाची आईवडील किंवा भाऊ बहीण किंवा ईतर कोणी नातेवाईकांनी येऊच नये किंवा राहु नये हीच मानसिकता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
त्यामुळे शहरात जर बघितले तर नवरा बायको राहणारे जोडी किमान 95% आहेत.आणि म्हतारे आई वडील मात्र घराकडे गावाला असतात..
बिचारे वाट पाहतात..
माझा मुलगा कधी गावाला येतो ..
माझा नातु किंवा नात कधी गावाला येतात..
पण आजकालच्या रमाईची लेक म्हणणारया लेकी मात्र नवरयांच्या आईवडीलांचा काही विचार करत नाही..
आपण ही कालांतराने म्हतारे होणार आहोत किंमान याचा तरी विचार केला पाहिजे..
(म्हणुन पुन्हा एकदा सांगतो रमाई हे एक नाव नाही रमाईने आपल्या घरातल्या सर्वांना अगदी जाऊबाईना ही संभाळल्या
म्हणुन रमाई हे एक नाव नाही तर
रमाई एक संस्कार आहे
रमाई एक जबाबदारी आहे
आणि रमाई एक कर्तव्य आहे
रमाईच्या लेकीनी आज माता रमाईच्या या जयंतीदिनी किमान काही वेळ तरी आपल्या सध्याच्या परिस्थीतीचे काही मिनिटे का होईना पण चिंतन केले पाहिजे..
रमाई पुन्हा एकदा नव्या पध्दतीने समजुन घेतली पाहिजे
आणि रमाई समजुन घेताना किंवा रमाईचे गुण अंगीकारताना घरातल्या त्यां पुरुषांची ही तेवढीच जबाबदारी आहे कि
आपण जर माता रमाईच्या संस्काराचा विचार करतो तर आपल्या पत्नीला तेवढा मान सन्मानाने वागवले पाहिजे.आपल्या पत्नीला विहारामध्ये नियमित जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे..
आणि या सर्वामध्ये आपण स्वतः आपले व्यसन करतो कि नाही याचा विचार केला पाहिजे.
आणि आपण किमान कोणतेही व्यसन करु नये अगदी तंबाखु गुटबा,सिगारेट,दारु,बिअर ,गांजा मावा ) अशा कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये हिच खरया अर्थाने आपण रमाईचा लेक किंवा रमाईची मुलगी आहे असे समजु शकतो आणि माता रमाईच्या जयंतीनिमित्त किमान एक प्रतिज्ञा केली पाहिजे.
मी व्यसन करणार नाही. मी पुढील काही महिन्यात किमान दोन व्यसनी व्यक्तीनी व्यसन करणे सोडावे या करीता मी प्रयत्न करणार.. हीच खरया अर्थाने माता रमाई च्या जयंतीदिनाच्या सदिच्छा
आपलाच
यश भालेराव
9067047333

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!