केंद्राचे बजेट:2024-25 शोषित वंचितांना काय मिळणार!
इ झेड खोब्रागडे.
दि 1 फेब्रुवारी 2024 ला संसदेत केंद्राचे बजेट -वार्षिक अर्थसंकल्प 2024-25 वित्त मंत्री सादर करतील. या बजेट मध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक यांना काय मिळणार ,याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे मतदारांना लुभावणाऱ्या घोषणा होणार.असो।
अनुसूचित जातींच्या विकासासाठी वर्ष 2023-24 मध्ये 159126 कोटींची तरतूद केली होती. लोकसंख्येचे नुसार खरं तर 235705 कोटी(लोकसंख्या sc ची 16.6%) आणि नीती आयोगाचे धोरणानुसार203991( 14.37% नुसार) ,बजेट तरतुद पाहिजे होती परंतु केली 159126 कोटी.
या तुरतुदींचे पुढे काय झाले?प्रतक्ष्यात किती निधी उपलब्ध झाला व खर्च किती आणि कशावर झाला? किती कुटुंबांना व व्यक्तींना लाभ झाला ह्याची माहिती सरकारने योजनानिहाय करावी.विकसित भारताचा संकल्प म्हणून योजनांची प्रसिद्धी देशभर केंद्र शासन करीत आहे। त्यात अनुसूचित जाती व जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक यांचे साठी नेमके काय साध्य केले ह्याची माहिती सरकारने प्रसिद्ध करावी.
माहितीसाठी , वर्ष 2015-16 ते 2022-23या वर्षातील बजेट मध्ये नाकारलेला निधी 412021 कोटी एवढा आहे. पाहिजे होते ,1027740 कोटी,बजेट मध्ये केलेली तरतूद 615619 कोटी आणि नाकारलेली 412021 कोटी. तरतूद केलेल्या 615619 कोटींचा खर्च कशावर झाला? किती लोकांना फायदा झाला ? खर्च झाला नसेल तर का नाही आणि कोण जबाबदार ?ह्याबाबत सरकारने सांगावे.
अनुसूचित जातीसाठी असलेले बजेट त्याच्यावरच खर्च करण्याचे बंधन आहे.हा निधी divert करता येत नाही आणि lapse सुद्धा होत नाही. जी रक्कम खर्च झाली नाही ती आणि नाकारलेली रक्कम या वर्षीच्या बजेट मध्ये केंद्र सरकार देणार का? धोरणाप्रमाणे द्यायला पाहिजे. सामाजिक आर्थिक न्यायासाठी आवश्यक आहे. सरकारची ही संविधानिक जबाबदारी आहे. माननीय प्रधानमंत्री व वित्तमंत्री यांनी याबाबत बोलावे.
वर्ष 2023-25 हे संविधानाचे 75 वे वर्ष आहे. संविधानाचा अमृत महोत्सव : घर घर संविधान हे अभियान सरकारने सुरू करावे. यासाठी आम्ही संविधान फौंडेशन चे वतीने oct 2022 पासून PMO ,Cabinet Secy ,यांचेकडे पाठपुरावा सुरू आहे. बजेट च्या भाषणात याबाबत सरकारने घोषणा करावी. जसा ,आझादी चा अमृत महोत्सव देशभर साजरा केला, ghar ghar तिरंगा केला तसे संविधानाचा अमृत महोत्सव, घर घर संविधान, गणतंत्राचा अमृत महोत्सव साजरा करावा. संविधान जागृतीचे काम म्हणजे राष्ट्रनिर्माणाचे कार्य आहे. संविधानाप्रति सन्मान आहे हे कृतीतून दाखविण्याचे हे अभियान आहे. नागरिकांचा उत्सव ,लोकशाहीचा उत्सव सुद्धा आहे. केंद्र सरकारने करावे व संविधानाप्रति श्रद्धा व निष्ठा व्यक्त करावी.
इ झेड खोब्रागडे, भाप्रसे निसंविधान फौंडेशन नागपूर
दि 30 जानेवारी 2024
M- 9923756900
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत