वक्फ बोर्डाचा बागुलबुवा प्रचार आणि वास्तव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवायला आणि साडेसात वर्षात आपल्या कामगिरीचे काय दिवे लावलेत याबद्दल सांगायला काहीही नसल्याने नेहमीच हिंदू मुस्लिम गाणं लावलेलं आहे.
या गाण्यात भाजपची चाळीस पैशावर पोसलेले पिल्लं वक्फ बोर्डाचे मेसेज पसरवून जणूकाही आता आपल्या सगळ्या घरदारावर सातबारावर वक्फ बोर्ड बसून आपण देशोधडीला लागणार अस चित्र निर्माण करत आहेत.
या अपप्रचाराला साधं सोपं उत्तर आहे.
१.
जर हा वक्फ बोर्डचा कायदा आधीपासूनच अस्तित्वात असेल तर मागल्या सत्तर वर्षात देशाची सगळी जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर का करून घेतली नाही ?
२.
अजूनही देशात सरकारला सुद्धा जमीन पाहिजे असेल तर भूमिअधिग्रहण कायदा आहे, तुम्हाला तुमच्या जमिनीचा उचित मोबदला मिळाला नाही तर तुम्हाला कोर्टात जाण्याचा पर्याय आहे ,कोर्टाने नुकसानभरपाई द्यायला जिल्हाधिकारी खुर्ची जप्तीचे आदेश अनेकदा दिल्याचा बातम्या आपण वाचतो,मग या वक्फ ने असल्या जमिनी ताब्यात घेतल्या असत्या तर लोक कोर्टात गेले नसते ?
३.
हा प्रश्न हिंदूंच्या मालमत्तेचा असेल तर अडवाणी वाजपेयी नी रामाला घर देण्यासाठी यात्रा काढायच्या आधी हिंदूंची घर जमिनी वाचवायला रथयात्रा का काढली नाही आणि आंदोलन का उभारली नाहीत ?
४.
आताच सगळी वक्फ बोर्ड अचानक जागी झालीत याचा अर्थ मागच्या ७० वर्षात काँग्रेसचे सरकार जास्त भक्कम होते आणि तुम्ही आता नालायक ठरलाय का ?
५.
निवडणूक आयुक्त नेमण्याचा अधिकारापासून, महिला आरक्षण असो की ३७० कलम हटवणे असो, तुम्हाला दहा वर्षे संसदेत पाशवी बहुमत होत, तुम्ही खासदार निलंबित करून पाहिजे ते कायदे मंजूर करून घेतलेत मग हे वक्फ बोर्ड बंद करायचा कायदा करायला काकाजींच्या हाताला कुणी बांधून ठेवलेलं होत ?
६.
भाजपची सरकार असताना त्या त्या राज्यात कायदे करून या वक्फ बोर्डचा कारभार राज्याच्या ताब्यात घ्यायला कुणी हात बांधलेले होते ?
७.
निवडणूक आली की वक्फ बोर्डचा मुद्दा चर्चेत येतो मग तुम्हाला दहा वर्षे संपूर्ण बहुमत काय भारे बांधायला दिलेलं आहे का ?
८.
आपल्या खांद्यावर असलेल्या मडक्यात निर्वात पोकळी नसेल तर लोकहो वरच्या सोप्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मनाला विचारून बघा, एका क्षणात ही चाळीस पैशाची पिल्लं पळून जातील.
आनंद शितोळे
ज्याचीलाजत्याचाच_माज
आपल्याधडावरआपलेच_डोके
सीधी_बात
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत