मधु दंडवते अ.नगर ते दिल्ली व्हाया कोकण रेल्वे…

आपला सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर
संस्थापक सदस्य कोकण रेल्वे
९४०४१३५६१९
अहमदनगर जिल्ह्यात जन्माला आलेले मधु दंडवते नगरकर कधी झालेच नाहीत. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन त्याबरोबरच आपले शिक्षण सुरू ठेवून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधी गप्प बसले नाहीत. त्यानंतर ते गोवा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रमिला दंडवते सपत्नीक गोवा सत्याग्रहात स्वतःला झोकून दिले आणि हे सर्व शक्य झाले ते केवळ आणि केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेमुळे
पीपल पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पदार्थ अणु शास्त्रज्ञ विभागाचे थोर शास्त्रज्ञ आपली नोकरी सांभाळून स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेत दंडवते यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवायला सुरुवात केली. अनेकांनी याबाबत डॉक्टर बाबासाहेब यांच्याकडे तक्रारी केल्या त्यावर बाबासाहेब म्हणाले स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणे हा गुन्हा होऊ शकत नाही शिक्षणामध्ये किंवा शिकवण्यामध्ये मधु जर कमी पडत असेल तर मला तक्रार करा असे परखड खडे बोल सुनावल्यानंतर प्राध्यापक मधु दंडवते यांच्या कार्याला आणखीन जोर मिळाला.
प्रमिला कारंडे या सेवा दलात काम करणाऱ्या युवती बरोबर त्यांचा विवाह झाला पदवीधर असलेल्या प्रमिला या डॉक्टर जनार्दन कारंडे यांची कन्या पुढे स्वातंत्र्य चळवळीत व सत्याग्रहात सर्वत्र त्यांनी एकत्र सहभाग नोंदवला एवढंच नव्हे तर अनेक वेळात तुरूंगवास भोगला . महिला आरक्षणाच्या जनक म्हणून प्रमिला दंडवते यांचे कार्य मोठे आहे तसेच महिला आयोगाची स्थापना सुद्धा त्यांनीच केली अतिशय विद्वान आणि परखड व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रमिला दंडवते यांचे माहेर वेंगुर्ला येथे असल्यामुळे 1971 साली बॅरिस्टर नाथ पै.यांच्या निधनानंतर रिकामी झालेली राजापूर मतदार संघाची जागा मधू दंडवते यांना मिळाली व दंडवते यांच्या रूपाने संपूर्ण संसदेमध्ये एक विरोधी पक्ष नेता अभ्यासू व्यासंगी नेतृत्व कोकणला मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू जसे नाथ पै यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः उपस्थित राहत त्याचप्रमाणे मधु दंडवते यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इंदिरा गांधी स्वतः संसदेमध्ये उपस्थित राहत यातच त्यांच्या अभ्यासाचा प्रभाव दिसून येतो
मुळगाव अहमदनगर असून राजापूर मतदार संघातून केवळ बॅ. नाथ पै यांनी इंदिरा गांधींच्या समोर एक रुपया अर्थसंकल्पात कपात सुचवून कोकण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण केले होते व याच कोकण रेल्वेच्या मागणीच्या पाठपुरावा करण्यासाठी राजापूर मतदार संघातील जनतेने मधु दंडवते यांना निवडून दिले गरीब हटावच्या इंदिरा गांधींच्या बोगस भूलथापांना सुद्धा कोकणातला माणूस कधी बळी पडला नाही व मधु दंडवते खरोखरच 1977 साली दुसर्यादा जेव्हा निवडून आले कारण 19 महिने आणीबाणी च्या पर्वात दंडवते सपत्नीक 19 महिने तुरुंगात होते तुरुंगातून सुटून आल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला व जनता पार्टीची लाट आली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्या मंत्रिमंडळात थेट रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली ते सांगण्यासाठी जेव्हा पत्रकार दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी गेले तेव्हा ते स्वतःचे कपडे स्वतः धुवत बसले होते. पत्रकार जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा पत्रकारनी त्यांना सांगितले साहेबांना बाहेर बोलवा. तेव्हा जैन नावाच्या एका पत्रकाराने सांगितले हेच मधू दंडवते आहेत.एवढी साधी राहणी होती.
रेल्वेमंत्री म्हणून मधु दंडवते यांनी अमुलाग्र बदल केले रेल्वे पूर्वी क्रमांकांनी ओळखली जात होती 14 60 अप तर 14 61 डाऊन अशा वेगवेगळ्या नंबरने रेल्वेची ओळख होती ती पुसून त्यांनी प्रत्येक रेल्वेला वेगवेगळे नाव दिले. त्याची सुरुवात मुंबई कलकत्ता एक्सप्रेस ला गीतांजली एक्सप्रेस या नामकरणाने केली. कारण गीतांजली या रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यसंग्रहाला पहिले नोबेल मिळाले होते अशाच प्रकारे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ला “ययाती पॅसेंजर “हे नाव मी सुचवले होते कारण वि स खांडेकर यांच्या” ययाती” कादंबरीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.व खांडेकर मुळ
गाव शिरोडा सावंतवाडीचे
प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये जुन्या काढून टाकलेल्या गाद्या या द्वितीय श्रेणीच्या डब्यामध्ये लावून द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी त्यांनी सुरुवात केली. मेल एक्सप्रेस चे डबे नऊ किंवा दहा असे असायचे त्यावेळी मधु दंडवते यांनी 22 पर्यंत डबे वाढवण्याची कल्पना रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडले परंतु कोणत्याही गोष्टीला नकार कसा द्यायचे व शिताफिने ती गोष्ट टाळायची यामध्ये मुरलेले अधिकारी ताकास तूर लागू देत नव्हते त्यावेळी डबल इंजिनची कल्पना मधु दंडवते यांनी मांडली कोणताही शास्त्रज्ञ जेव्हा मंत्री होतो तेव्हा तो आपले सर्व कस पणाला लावून अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवतो त्याचप्रमाणे एका गाडीला दोन इंजिन लावून त्याची क्षमता वाढवण्याचे काम मधु दंडवते यांनी सुरू केले म्हणूनच आज 22 ते 24 डबे असणाऱ्या गाड्या दिसत आहेत म्हणून देश अनाडी नेत्यांच्या हाती न देता उच्चविद्याविभूषित लोकांच्या हातामध्ये दिला पाहिजे तरच देश प्रगती करू शकतो
हार्बर लाईनची मानखुर्द पर्यंत जाणारी सिंगल लाईन दुहेरीकरण केले हार्बर मार्गाची वाहतूक मानखुर्द वाशी पनवेल. हार्बर मार्गावरील ठाणे घणसोली वाशी यांचा विस्तार आराखडा तयार केला तसेच पनवेलला थेट जोडणारी नगर माळशिरस रेल्वे लाईनचे भूसंपादन केले. आजही पनवेल माथेरान रोड आणि नेरळ पर्यंत रेल्वे साठी संपादित असा शिक्का काही जमिनीच्या ७/१२ वर पडला आहे.
मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळले परंतु दिवा पनवेल ते आपटा रोहा असा मध्य रेल्वेचा मार्ग बांधून पूर्ण झाला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स का पाटील यांनी जीवा पनवेल येथे रेल्वे आणून पनवेलच्या इतिहासामध्ये पहिल्या रेल्वेची नोंद केली हे रायगडच्या लोकांनी हा इतिहास लक्षात ठेवावा.
त्यानंतर कोकण रेल्वेचे काम पूर्णपणे ठप्प झाले ते थेट 1991 साली विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार आले त्या सरकारमध्ये प्राध्यापक मधु दंडवते यांना अर्थमंत्री पद मिळाले व जॉर्ज फर्नांडिस यांना रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली व मधु दंडवते जॉर्ज फर्नांडिस या दोन नेत्यांनी कोकण रेल्वे कार्पोरेशन ची स्थापना केली व या कार्पोरेशन ला महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्याचा 50 टक्के निधी व 50 टक्के केंद्राचा निधी देऊन काम सुरू केले व त्यावर ही श्रीधरण या अधिकाऱ्याची कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
व तो ऐतिहासिक दिवस निवडला गेला 12 ऑगस्ट 1990 माटुंगा येथील पोतदार काॅलेज येथे भारतातील पहिली कोकण रेल्वे परिषद भरवली गेली आणि त्या परिषदेचा संस्थापक सदस्य या नात्याने मी हा लेख लिहीत आहे. अध्यक्षपदावरती रणजीत भानू होते परशराम तावरे शांताराम फिलसे पुष्पसेन सावंत
हे आमदार उपस्थित होते व या परिषदेचे उद्घाटन जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते झाले सर्व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने या परिषदेचा उद्देश कोकण रेल्वे कशा पद्धतीने असेल नकाशा मानचित्र याची सर्व उपलब्धता त्यावेळी केलेली होती मधु दंडवते जॉर्ज फर्नांडिस मृणाल गोरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. दिनेश केळुसकर भाऊसाहेब परब शंकराव साळवी अशा महान समाजवादी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडली कोकण रेल्वे ची ही पहिली परिषद झाल्यानंतर त्याची खिल्ली अनेक लोकांनी उडवली त्यातलाच एक अनुभव मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र स्टेट बँकेचे येथे पुण्याला असणारे एक वरिष्ठ अधिकारी कानेटकर मला म्हणाले होते रेल्वेचे रूळ विकून भागीदारकांचे पैसे द्यावे लागतील कारण कोकण रेल्वेने तेव्हा रोखे काढले होते (शेअर सर्टिफिकेट काढले होते.)
कोकण रेल्वे चे बांधकाम सुरू झाल्यापासून संपूर्ण कोकण रेल्वे रोहा ते मेंगलोर म्हणजेच ठोकरूल पर्यंत संपूर्ण काम आठ वर्षात पूर्ण झाले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या व कमिशन खाणाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा प्रभू रामचंद्र ना 14 वर्षे वनवास पत्करावा लागला होता पण वनवासानंतर प्रभू रामचंद्र देव झाले व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ती अपघातामध्ये काही कोकणी माणसे देवाघरी गेली कोकणी माणसाला मुंबई गोवा राज्य महामार्गावरती सोळा वर्षे झाली तरी त्यांचा वनवास संपत नाही. कोकण रेल्वेचे काम जेव्हा सुरू झाले तेव्हा प्रत्येक पिलरवर खांबावरती आडव्या टाकलेल्या तुळयावरती लिहिलेले होते “स्वप्न नव्हे सत्य” कोकण रेल्वे आणि खरोखरच एखादे स्वप्न उराशी बाळगून कोकणी माणसांना त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याचे काम मधु दंडवते यांनी केले आजही कोकणातील कुठल्याही गाडीमध्ये बसल्यानंतर पूर्ण गाडीमध्ये एक तरी असा प्रवासी असतो की मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव कोकणी माणूस आवर्जून घेतो ११ महिन्याचा कालावधी मंत्रिमंडळात असताना सुद्धा अकरा महिन्यांमध्ये भारताच्या रेल्वे नकाशा वरती कोकण रेल्वे आणून जगाला तोंडात बोटे घालायला लावली .माणूस किती वर्ष सत्तेमध्ये आहे याला अजिबात महत्त्व नाही किती काळ सत्तेत राहून किती काळामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आपली नोंद करणाऱ्या नेत्यांची नावे हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत . त्यात मधु दंडवते जॉर्ज फर्नांडिस नाथ पै.हि नावे आहेत
भारताच्या इतिहासामध्ये मधु दंडवते यांच्या नावाचा उल्लेख आणखीन एका गोष्टीसाठी केला जातो तो म्हणजे त्याग. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी मधु दंडवते यांना सहज भेटीसाठी बोलावले होते व आपल्या मंत्रिमंडळामध्ये सर्वोच्च असे पद देण्याचे प्रलोभन त्यांना दाखवले त्यामागे त्यांचा उद्देश खूप चांगला होता परंतु मी जर तुमच्या पक्षात आलो तर भारताचं महत्त्वाचं विरोधी पक्षनेते पद कोण सांभाळणार असे हसत हसत उत्तर देऊन मधु दंडवते यांनी ती ऑफर नाकारली तसाच दुसरा एक किस्सा जेव्हा मधु दंडवते यांचा पराभव मेजर सुधीर सावंत यांनी केला तेव्हा मेजर सुधीर सावंत यांनी लष्करातून दिलेल्या राजीनामा याला सहा महिने पूर्ण झाले नव्हते त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली असती परंतु राजकारणामध्ये एवढा मोठा मेजर आज खरोखर देशाची सेवा करून जर राजकारणामध्ये येत असेल आणि लोकांचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असेल तर त्याला मी अपशकुन का करू जर ते न्यायालयात गेले असते तर मेजर सुधीर सावंत यांची खासदारकी निवडणूक अधिनियमानुसार रद्द झाली असती कारण कोणत्याही सरकारी कार्यालयातून निवृत्त झाल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर सहा महिने पर्यंत निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे परंतु मोठ्या मनाचे मधु दंडवते यांनी त्या गोष्टीला दुर्लक्ष करून मेजर सुधीर सावंत यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर देवेगौडा जेव्हा पंतप्रधान झाले तत्पूर्वी व्ही पी सिंग मृणाल गोरे लालूप्रसाद यादव मुलायम सिंग यादव जॉर्ज फर्नांडिस यांनी पंतप्रधानपद मधु दंडवते यांनी घ्यावे यासाठी आग्रह सुरू केला परंतु मधु दंडवते यांनी साफ सांगितले की जर लोकांनी मला नाकारले तर मी मागच्या दाराने पंतप्रधान का होऊ? खरंतर आणखी एक टर्म जरी मधु दंडवते यांना मिळाला असता तर कोकण रेल्वे मार्गावरती रेल कोचचा मोठा कारखाना उभा राहिला असता ज्यामध्ये किमान एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु त्याचवेळी एक मोठे षडयंत्र रचले गेले व गोबेल तंत्रज्ञानाला कोकणी जनता बळी पडली सुरेश प्रभू जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळी उपस्थित असलेल्या मधु दंडवते यांच्या पायाला चरण स्पर्श करून त्यांनी नमस्कार केला आजही तो व्हिडिओ मोदींच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री मधू दंडवते यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो या नावाने प्रसिद्ध आहे. त्यागाचे आणखीन एक रूप म्हणजे मधु दंडवते यांनी आपली सर्व संपत्ती सरकार जमा करून शेवटी आपला देह सुद्धा दान केला त्यांच्या मृत्युपश्चात दैनिक सामनाच्या अग्रलेखांमध्ये बाळासाहेब ठाकरे लिहितात “राजकारणामध्ये एकच दंडवते बाकी सगळे गंडवते”
2024 हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. मधु दंडवते यांच्या ऋणातून कोकणी माणूस कधीच मुक्त होऊ शकत नाही परंतु 21 जानेवारी 2024 ते२० 25 या मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्राध्यापक मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी टर्मिनसला देण्यात यावे तसेच मधु दंडवते यांचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव परळ टर्मिनस ला देण्यात यावे तसेच ज्या स .का. पाटलांनी पनवेलला रेल्वे आणली त्या सका पाटलांचे नाव पनवेल टर्मिनसला देण्यात यावे मेंगलोर येथे जन्मलेले साथी जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव मेंगलोर टर्मिनस ला देण्यात यावे व बॅरिस्टर नाथ यांच्यामुळे कोकण रेल्वे चा पाया रचला गेला त्यांचेही नाव कोकण रेल्वेच्या एका स्टेशनला दिले पाहिजे तसेच रावबहादूर बोले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वखर्चाने केलेल्या कोकण रेल्वे सर्वेक्षणाला त्या काळातल्या यंत्रसामुग्रीमुळे कोकण रेल्वेचे काम सुरू झाले नाही पण त्याच्ये नाव सुध्दा एखाद्या रेल्वे स्टेशन ला दिले पाहिजे भारतात पहिली रेल्वे कोकणातच धावली ठाणे ते बोरीबंदर हा इतिहास लक्षात घेता वरिल सर्व मागण्या याची पूर्तता मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षात पूर्ण व्हावी वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी सीएसटी रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस पनवेल चिपळूण मेमो अशा मागण्या मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षात पूर्ण व्हाव्या कोकण रेल्वे चे दुहेरी करणं झाले पाहिजे.कोकण रेल्वे चे विलिनीकरण भारतीय रेल्वेत करून पनवेल ते मेंगलोर स्वतंत्र विभाग निर्माण करून त्या विभागाला अतिरिक्त निधी मंजूर केला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मधु दंडवते यांना आदरांजली अर्पण करून मधु दंडवते जनशताब्दी वर्षासाठी लिहिलेला अहमदनगर ते दिल्ली व्हाया कोकण रेल्वे या लेखाला पूर्णविराम देतो. लेख आवडला असल्यास शेअर करा प्रसिद्ध करा त्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नाही दिवाळी अंकासाठी मात्र आवर्जून फोन करा कारण दिवाळी अंक आमच्या अनेक वाचनालयामध्ये आम्ही संग्रहाला ठेवत असतो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत