कॉम्रेड लेनिन यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली…

प्रा. गंगाधर नाखले
22/01/2024
21 जानेवारी 1924 ला लेनीनचे निधन झाले. म्हणजे काल लेनिन यांची पुण्यतिथी होती आणि 2024 हे लेनिन चे पुण्यतिथी शताब्दी वर्ष आहे. लेनिनने रुसमध्ये झारशाहीच्या अत्याचारातून ,शोषणातून रूसच्या जनतेची मुक्तता करण्यासाठी 1917 साली यशस्वी क्रांती केलीक्रांती केली.
मार्क्सच्या मृत्यूनंतर लेनिन याने साम्राज्यशाही बद्दल सविस्तर मांडणी केली. मार्क्सच्या विचार पद्धतीच्या आधारे, विश्लेषण पद्धतीच्या आधारे ज्या प्रश्नांची मांडणी मार्क्सने केलेली नव्हती, त्याची मांडणी लेनिन यांनी केली. तसेच स्वतःचे काही नवे सिद्धांताची नव्याने मांडणीही लेनिनने केली.
‘साम्राज्यशाही : भांडवलशाहीच्या पुढची अवस्था’
या नावाचा ग्रंथ लेनिन यांनी लिहिला. हे विधान लेनीनच्या मोठेपणासाठी केलेलं नाही. मार्क्सवादामध्ये लेनिनने भर घातली. त्यानं त्याच्या काळामध्ये जे घडलं, त्याचा अर्थ मार्क्सने सांगितलेल्या विश्लेषण पद्धतीच्या आधारे लावला. त्याचप्रमाणे लेणींनंतरच्या काळातल्या मार्क्सवाद्यांनी नंतरच्या काळातील घटनांचे विश्लेषण मार्क्सच्या विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या पद्धतीने करण्याची गरज आहे.यालाच मार्क्सवादाचा विकास करणे असं म्हणतात.
मार्क्सवाद हे साचलेलं तळ नाही. महाभारताबद्दल काही मंडळी असं सांगतात की, जगामध्ये जेवढे जेवढे सगळं आहे, तेवढा व्यासानं सांगितलेलं आहे. जगामध्ये जे जे सगळे आहे ते मी सांगितलं आहे, असं मार्क्स म्हणाला नाही. मार्क्सने असे भाकीत केलं की , एक अशी अवस्था तयार होईल, जेव्हा शासन संस्था घडवून पडेल. मार्क्सच्या या विधानाचा अर्थ काय ?
मार्क्स या विधानाचा अर्थ असा आहे की , हे विकसित होत जाणारा शास्त्र आहे. स्थळकाळमानाने, काळानुरूप त्याच्यामध्ये तुम्ही भर घातली पाहिजे. भर घालण्याची काही क्षमता आहे, कुवत आहे, ती मार्क्सच्या विश्लेषण पद्धतीतून तुम्हाला प्राप्त होऊ शकते. स्थळानुसार विश्लेषण, काळानुसार विश्लेषण, एकच काळ पण स्थळ वेगळी वेगळी असतील, तर त्याचाही मार्क्सवादी पद्धतीने विश्लेषण करता येतं.
चीनमधील परिस्थितीचे मार्क्सवादी विश्लेषण आणि भारतातील परिस्थितीचे मार्क्सवादी विश्लेषण कोणत्याही एका काळात एकच येऊ शकणार नाही. कारण स्थळ वेगळी वेगळी आहेत. भारतामध्ये 1947 पासून 1960 पर्यंतचे विश्लेषण आणि 1960 पासून 1990 पर्यंतचे विश्लेषण वेगवेगळी होतात.
विश्लेषण करण्याचे शास्त्र ,विश्लेषण करण्याची पद्धत, म्हणजे मार्क्सवाद आहे. मार्क्सने सर्व ठिकाणचे सर्व काळाचे विश्लेषण करून ठेवले आहे असं नव्हे. त्यानं विश्लेषण करण्याची पद्धती शिकविली. असं करा म्हणजे तुम्हाला योग्य अर्थ सापडू शकेल. मार्क्सच्या काळामध्ये साम्राज्यशाही नव्हती. त्याच्यानंतर साम्राज्यशाही हा प्रकार अस्तित्वात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत