कोर्टाने पक्षांतर बंदीचा कायदा रद्द करावा- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अशा पद्धतीने फटकारणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे असे म्हटलंय. ३० ऑक्टोबरपर्यंत राहुल नार्वेकर काही ठोस निर्णय घेतील आणि आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाचे अध्यक्ष असले तरी ते भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ते निर्णय घेणार नाहीत असा आम्हाला संशय आहे. राहुल नार्वेकर हे पक्षाने दिलेली लाईन धरून चालतात. त्यामुळे निर्णय घेण्यामध्ये विलंब होतोय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय देणार आहेत की नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न असा टोलाही त्यांनी लगावला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत