उल्हासनगर येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..


जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या उल्हासनगर शहरातील एकमेव महिला उद्यानात नवीन सभागृहाचे उदघाटन व सकाळी १० ते २ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .
सकाळी १२ते२ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धेला
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
दि.७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महिला व बाल उद्यान येथे खास महिलांच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन मा.अतीरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला मा.महापौर लीलाबाई आशान मॅडम उपस्थित होत्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी इनरव्हील क्लबच्या वतीने उद्यानात वॉटर फिल्टर बसवण्यात आले त्याचे
उद्घाटनप्रसंगी डॉ रेवती जठार , प्रोजेक्ट चेअरमन रुता कोलवेकर व इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या. यावेळी रांगोळी स्पर्धेचे विजेत्यांना सन्मान चिन्ह व सर्व सहभागी महिलांना प्रशस्तीपत्र व तुळस देउन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ७ बागकाम करणार्या महिलांना साडी व तुळस देउन सन्मानीत करण्यात आले.
सर्व उद्यानाच्या भिंतीवर महिला सक्षमीकरण संकल्पना राबवून उत्कृष्ट पेंटींग्ज केल्या बद्दल आर्किटेक्ट टिना केडीया हिला सन्मानीत करण्यात आले. उद्यान अधीक्षक दिप्ती पवार हिच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेच्या अनेक महिला पदाधिकारी सचीव प्राजक्ता कुलकर्णी, निलम बोडारे, श्रद्धा बाविस्कर, विशाखा सावंत, संगीता लहाने व दिप्ती पवार व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत