निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

प्रा .कवाडेसर कुठे गेला तूमचा डॉ . आंबेडकरांचे विचाराचा स्वाभीमान !


मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर प्रश्नावरून प्रकाशझोतात आलेले पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे संस्थापक नेते आदरणीय प्रा . जोगेंद्रजी कवाडेसर हे नुकतेच भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीनजी गडकरी यांची उमेदवारी दाखल करण्यास रॅलीमधे हजर होते . त्यांनी नितीनीजी गडकरी यांना पाच लाखाच्या फरकाने निवडून आनण्याचे आपल्या भाषणातून आहवान केले. त्यांनी जोमदार घोषणा देत संवीधान वाचवीण्यासाठी नितीन गडकरी यांना निवडून द्या असा आवाज बुलंद केला . मला नवल वाटते आंबेडकरी विचारांचे प्रा . कवाडेसर या नेत्यांच . हे प्राध्यापक असतांनी यांना या देशातील मोदी राजवटीचे कार्याच आकलन नसाव की गेल्या दहा वर्षात या राजवटीत भारताचे संवीधानाला न जुमानता हुकुमशाही पद्धतीने देश चालवीला आहे .याचे अनेक उदाहरण नजरेसमोर आहे . प्रा . कवाडेसरांना १५० खासदारांच संसदेतून निलंबन माहीत नसाव , त्यांना विल्कीश बानोच्या प्रकरणातील आरोपीना कायदा वेशीवर टांगून जेलमधून सोडून दिल हे माहीत नसाव, कायदा असतांनी मणीपुरमधे स्त्रियांनची नग्नधिंड काढली पण मोदी सरकारन काहीही हस्तक्षेप केलेला नाही हे माहीत नसाव ,कायदा हाती घेवून संपुर्ण भारतात झुंडशाही निर्माण करुन अल्पसंख्याक व दलीतावर दहशत निर्माण केली . एनआरसीचे कायदा पास झाला असतांनी जातीय दंगली याच संघवाल्यांनी केल्या हे माहीत नसाव , यांना निवडणुक रोख्यांचा नुकताच केलेला भाजपचा करोडो रुपयाचा घोटाळा माहीत नसावा , त्यांना ईडी सिबीआयचा चुकीचा वापर करणे व निवडून आलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल व सोरेन यांना विनाकारण केलेली अटक माहीत नसाव ,त्यांना दिल्लीचे जंतर मंतर मधे या भक्तानी भारतीय संवीधानाची होळी केली हे माहीत नसाव . हे सगळ संवीधान विरोधी घटना देशात मोदी सरकार करीत आहे व पून्हा त्यांचेकडून संवीधान वाचवीण्यासाठी नितीनजी गडकरी यांना निवडून देण्यासाठी प्रा . कवाडे घोष ना देत आहे याच नवल वाटाव तितक कमीच आहे . अनेक वेळा भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे आम्हाला बाबासाहेबांच संवीधान मान्य नाही ते आम्ही बदलवीणारच असे बोलले हे संपुर्ण देशातील लोकांनी एैकले आहे . हा सर्व देशातील संवीधान विरोधी घटनाक्रम असतांनी संविधान बदलवीण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपच्या नितीनजी गडकरी यांचे रॅली मधे जावून प्रा . कवाडेसर घोषणा देतात की संवीधान वाचवीण्यासाठी नितीनजी गडकरी यांना पाच लाखाच्या फरकाने निवडून द्या . प्रा . कवाडे सरांना सत्ताधारी वर्ग संवीधानाला न जूमानता हुकुमशाही प्रवृत्तीने काम करीत आहे हे अजून कळलेच नसेल काय ? संघ राष्ट्रद्रोही हुकुमशाहीच समर्थन करणार संघटन आहे हे खुद्द डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनीच संगीतले होते . हे सगळ प्रा . कवाडे सर कसे काय विसरले ? असे लक्षात येते की डॉ . बाबासाहेबांचे विचारा संदर्भात कोण्याच नेत्यांना काहीही देणे घेणे दिसत नाही . फक्त वयक्तीक स्वार्थासाठी स्वःतला आंबेडकरी चळवळीचा नेता समजणाऱ्या नेत्यांनी बलशाली असलेल्या आंबेडकरी संघटनेचे असंख्य तुकड्यात विभाजन करून महामानवाच्या विचाराचा सत्यानास केला आहे . यांना अजून का कळले नाही सत्ताधारी लोक तूमचा फक्त फायदा घेते व वागणुक आपल्याच पायरीने देत आहे म्हणून . रामदासजी आठवलेंचे बघा काय हाल होत आहे ते त्यांना भाजप एक सिटपण देत नाही ईतकी नामुष्की त्यांच्या पदरी आली . तरी यांची लाचारी कायम आहेच . आज संवीधान खरोखर धोक्यात आहे हि लढाई संवीधान विरुद्ध भाजप अशी आहे, म्हणून सध्या संवीधान वाचवीण्यासाठी लढणाऱ्या लोकशाहीवादी आघाडी मधे आंबेडकरी नेते पाहीजे होते . परंतू हे आमचे आंबेडकरी विचाराचे बेगडी नेते जातीयवादी धर्मांध पक्षाचे उमेदवाराला मतासाठी आहवान करते. हि लाचारीची वेळ यांचेवर आली आहे . बाबासाहेबांचे बध्दल वाघासारखी डरकाडी फोडून भाषण देणारे प्रा . कवाडे सर भाजप आपल्याला भवीष्यात सत्तेचा तूकडा फेकणार यासाठी लाचार झालेले आहे . कुठे गेला प्रा .कवाडेसरांचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर विचाराचा स्वाभीमान !संपुर्ण जगात डॉ . बाबासाहेबांची उंची वाढत असतांनी भारतात बाबासाहेबाचेच स्वार्थी लोकांनी बाबासाहेबांची राजकीय विचाराची उंची कमी केल्याच महापाप या सगळ्या दलीत नेत्यावर येणार आहे . येत्या काळात आंबेडकरी चळवळ संपवीणाऱ्या नेत्यामधे सुध्दा रामदास आठवले सोबत प्रा . कवाडेसरांच नाव इतीहासात गणल्या जाईल हे सुर्यप्रकाशाईतक सत्य आहे . म्हणून तमाम आंबेडकरी मतदारांना माझी नम्र विनंती आहे आपन नेत्यामागे न लागता सध्या भाजप उमेदवाराचा पराभव करणाऱ्या उमेदवाराला निवडून आना व देशाचे संवीधान वाचवा . संविधान वाचले तर आपन सगळे वाचू अन्यथा आपन सगळे येत्या काळात हुकुमशाहीच्या जमान्यात जिवन जगू .

दिलीप शापामोहन
तिवसा, जि . अमरावती
मो . ७५५८३५९३६१

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!