बार्टीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप न देणाऱ्या राज्य सरकारचा अन्याय…

वारंवार मागणी करुण राज्य सरकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विद्यार्थ्यांना न्याय देत नाही. असा आरोप बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 चे संशोधक विद्यार्थी उत्तम शेवडे, लालदेव नंदेश्वर, योगिता पाटील, अंकित राऊत आदींनी आज एका पत्रपरिषदेत केला. अनुसूचित जातीच्या पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांचा पीएच. डी. साठी प्रवेश होऊन आजं 21 महिने झाले असून अनुसूचित जातीच्या बार्टीकडे अर्ज केलेल्या * पीएचडीच्या 2022 च्या 761 विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासुन सरकसट फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी मागील 21 महिन्यापासून विद्यार्थी संघर्ष करत असुन बार्टी कार्यालय पुणे येथे गेल्या 107 दिवसापासुन 2022 चे पीएचडीचे संशोधक विद्यार्थी नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिपच्या मागणीसाठी ऊ विद्यार्थी उपोषण करत आहेत. या न्याईक मागणीसाठी मुंबई, नागपूर व पुणे या ठिकाणी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, उपोषणे करुणही विद्यार्थ्यांची रास्त मागणी असताना झारीतील शुक्राचार्य असलेले सामाजिक न्याय विभागाचे मंत्रालयीन सचिव सुमंत , बार्टीचे संचालक सुनील वारे हे कसल्याच प्रकारे विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत नाहीत.
महाज्योती या फेलोशिप देणाऱ्या संस्थेकडे पाहिले असता ती संस्था पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना 2022 मध्ये दि. 2-11-2022 च्या पत्रानुसार 1226 विद्यार्थ्यांना विना परीक्षा सरसकट फेलोशिप मंजूर करून त्या फेलोशिपची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तर दुसऱ्या बाजुला सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दि. 21-9- 2022 च्या पत्रानुसार 851 मुलांना विना परीक्षा सरसकट फेलोशिप मंजूर होऊन त्यांच्या खात्यात रक्कमही जमा केली जाते. तसेच सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची 2023 ची प्रक्रिया पूर्ण होत आली असतानाही, सारथी व महाज्योती संस्था विद्यार्थ्यांचा पीएचडीला प्रवेश झाल्यावर जवळपास तीन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करुन सरसकट 2022 च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देते. गेल्या 107 दिवसांपासून उपोषण चालू असतानाही या महाराष्ट्रात बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय राज्य सरकार अद्यापही का घेत नाही? आहे. असाही सवाल विद्यार्थ्यांनी केला तर अनुसूचित जातीच्या 2022 च्या पीएच.डी धारक विद्यार्थ्यांना फेलोशिप देणारी बार्टी ही संस्था पीएच.डी धारकांचा प्रवेश होऊन 21 महिने झाले.
अन्यथा हा लढ्ढा तीव्र केला जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी राज्यसरकारची राहील. असा इशारा यावेळी बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे उत्तम शेवडे, लालदेव नंदेश्वर, योगिता पाटील, अंकित राऊत, नितीन गायकवाड, संदेश भिवगडे, प्रतीक झाडे, संदीप शंभरकर, ममता सुखदेवे, दिपाली गजभिये, शैलेश डोंगरे आदी संशोधक विद्यार्थ्यांनी दिला. बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती 2022 नागपूर विभाग नागपूरच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की बार्टीच्या 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा न घेता विनाविलंब सरसकट फेलोशिप देण्याची भूमिका घ्यावी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत