नवीन दंड विधानात अपघातासाठी शिक्षा व वस्तुस्थती…

अनिल वैद्य माजी न्यायाधीश तसेच आंबेडकरी विचारवंत लेखक !
देशभर वाहन चालकांनी विशेषतः ट्रक वाहन चालकांनी संप पुकारला होता.त्या मुळे जीवनावश्यक वस्तू पेट्रोल डिझेल इत्यादीचां ठिकठिकाणी तुटवडा पडला होता.
वाहन चालकांनी गुन्हा केला तर जबर शिक्षेची तरतूद केली आहे . वाहन चालक आंदोलन करीत आहेत.
म्हणून नविन तरतुदी समजून घेण्यासाठी हा लेख प्रपंच!
ब्रिटिशांनी १८६० ला लागू केलेला कायदा म्हणजे भारतीय दंड संहिता १८६० हा आहे.ब्रिटिश सरकारने १८३४ ला इंडियन लॉ कमिशन स्थापन केले होते.त्याचे चेअरमन लॉर्ड थॉमस बेबिंग्टन मेकॉले होते.
त्यांनी १८६० पासून भारतीय दंड विधान लागू केले आहे.
नुकतीच केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता या कायद्यात सुधारणा केली व नवीन नाव भारतीय न्याय सहिता कायदा २०२३असे दिले आहे.
नवीन कायद्यानुसार हिट अँड रन म्हणजे अपघात करुन पळून जाणे या प्रकरणामध्ये रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहनचालकाने तिथून पळ काढला तर वाहन चालकाला दहा वर्षां पर्यंत तुरुंगाची शिक्षा आणि दंड अशी तरतूद केली आहे.
आधी अशा प्रकरणांमध्ये चालकाची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३०४ अ(निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि ३३८ (निष्काळजी पने दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात यायचा. यामध्ये सर्वसाधारणपणे दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती.
पण अपघातानंतर बरेचदा वाहनचालक पळून जात होते ही वस्तुस्थिती आहे.
गुन्हा ज्या कृत्याला म्हणतात त्यासाठी कोणत्याही कृत्यात गुन्हेगारी तत्व उपस्थित असणे गरजेचे असते.
न्याय शास्त्र नुसार गुन्हा करण्याचा हेतू असावा लागतो ,त्या गुन्ह्यासाठी त्याने योजना आखून तयारी केली असावी तरच तो गुन्हा ठरतो.१हेतू २पूर्वतयारी ३ कृती हे तीन घटक कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे की नाही हे ठरवीत असते.
अपघात हा गुन्हा अशा रीतीने पूर्व नियोजितपने केल्या जात नाही.ती अचानक घडनारी घटना आहे.त्या मुळे न्यायतत्वाचे तीन निकष लावले तर तो गुन्हाच ठरतं नाही.तेव्हा त्या साठी भलीमोठी दहा वर्षाची शिक्षा देणे न्यायसंगत नाही.
तथापि निष्काळजीपने भरधाव वेगाने वाहन चालविणे हा गुन्हा ठरेल कारण ते कृत्य त्याने हेतुपुरस्सर केले असते. शिक्षेची तरतूद केली नाही तर खुला परवानाच मिळेल.
भा द वी ३०४ अ हे पूर्वीचे कलम
नव्यानं तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१)मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यानुसार, चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, चालकाला जास्तीत जास्त ५ वर्षां पर्यंत शिक्षा आणि द्रव्य दंडही ठोठावला जाईल अशी तरतूद केली आहे. या मधे ५ वर्षा पर्यंत शिक्षा म्हणजे एक दिवस सुध्दा असू शकते. अर्थात १दिवस ते ५ वर्ष पर्यंत असू शकते.
कलम १०६(२)
हे कलम नव्याने दाखल करण्यात आले. बेदरकारपने हयगयीने वाहन चालवून कुणाचा मृत्यू झाला आणि जर ड्रायव्हर ने पोलिसांना किंवा दंडाधिकारी यांना
सूचना न देण्याचा गुन्हा केला व पळून गेला तर त्याला १० वर्षा पर्यंत तुरुंग आणि दंड अशी शिक्षा होवू शकेल अशी तरतूद केली आहे.
यात पण १० वर्षा पर्यंत असे नमूद केले आहे त्या मुळे १ दिवस ते १० वर्ष कितीही शिक्षा होवू शकते.
गुन्हेगाराचे वय, चारित्र्य, गुन्ह्याचे स्वरूप
इत्यादी बाबिवरून विद्वान न्यायाधीश किती शिक्षा द्यायची ते निर्णय घेत असतात.तो स्वेच्छाचारी निर्णय घेत असतात.
निष्काळजीपणे वाहन चालविणे हा भा द वी कलम २७९ नुसार गुन्हा होता त्याचे नविन कलम
भारतीय न्याय सहीता नुसार २८१ झाले आहे. या गुन्ह्यासाठी ६ महिने पर्यंत तुरुंग किंवा १००० रुपया पर्यंत दंड अशी तरतूद केली आहे.
ड्रायव्हर हा फक्त ट्रक ड्रायव्हर गृहीत धरू नये. मोटर वाहन चालक मग तो कुणीही असू द्या तो ड्रायव्हर असतो तो चालक तुम्ही आम्ही असू शकतो.त्या मुळे या तरतुदी सर्वांना सारख्याच लागू होणार आहेत. हा केवळ ट्रक चालकांचा विषय नाही.
सरकारचे नोटीफिकेशन आले की तरतुदी लागू होतील.ते यायचे आहे.ते केव्हाही येवू शकते.
नवीन कायद्याने शिक्षेत वाढ केली आहे परंतु ६ वर्षच किंवा १० वर्षच शिक्षा असे बंधन नाही. या कलमात असलेल्या
पर्यंत शब्दा मुळे ती कमी होवू शकेल तो न्यायधीश् महोदय यांचा स्वेछाचारी निर्णय असेल.
कलम १०६ (१)हा गुन्हा जामीन पात्र आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्याालयाला खटला सूनावनीचे कार्यक्षेत्र दिले आहे ते पूर्वी सुध्दा होते.कलम
१०६(२) जे अपघात करून पोलिसांना माहिती न देता पळून जाणे या साठी शिक्षेची तरतूद करते तो गुन्हा मात्र
जामीन पात्र नाही म्हणजे नोंनबेलेबल केला आहे.या गुन्ह्याची सुनावणी सुध्दा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात होईल. अशी तरतूद केली आहे.म्हणजे जुन्या फौजदारी प्रक्रिया सहीतेच्या परिशिष्ट मधे तरतूद केली आहे तशीच आहे.
पूर्वीचे भा द वी कलम ३३६,३३७ व ३३८ साठी भारतीय न्याय सहिते मधे नवीन कलम १२५
दाखल करण्यात आले आहे यात निष्काळजी पने कोणतीही कृती करणे या साठी ३ महिन्यापर्यंत तुरुंग किंवा २५००रुपये दंड इतकी शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे.याच कलम१२५ मधे पुढे अ व ब भाग आहेत त्यात ६ वर्षापर्यंत,३ वर्षापर्यंत किंवा १० हजार रुपांपर्यंतच्या दंडाची शिक्षा अशी जबर शिक्षेची तरतूद केली आहे.
केंद्र सरकारने नविन कायदे केले आहेत .
भारती दंड विधान चे नविन नाव भारतीय न्याय सहिता २०२३, फौजदारी प्रक्रिया कायदाचे नविन नाव भारतीय नागरी सुरक्षा सहिता २०२३ झाले आहे.भारतीय पुरावा कायदा याचे नविन नाव भारतीय साक्ष अधिनिय२०२३ झाले आहे. कायद्यात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
परंतु निष्काळजीपने वाहन चालविणे या साठी फार मोठा बदल नाही.कलमांचे नंबरमधे भारी बदल आहेत.
अपघातानंतर पळून जाणे या साठी शिक्षेत वाढ केली आहे.
अपघातानंतर ड्रायवर ला अपघातस्थळी जमलेली गर्दी निर्दय पने मारतात ही वस्तुस्थिती आहे.
दोष अपघात करणाऱ्याचाच असतो
असे नाही तर अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचाही असू शकतो परंतु गर्दी तो विचार करीत नाही.
बदला घेण्याची किंवा अद्दल घडवि्न्याची गर्दीची मानसिकता असते. मॉब सायकॉलॉजी हा वेगळा विषय आहे.
भारतीय न्याय सहितीतेत मोब लिंचींग
म्हणजे संघटित गुन्हेगारी साठी कलम १११ नुसार जबर शिक्षेची तरतूद केली आहे .त्या साठी आजीवन कारावास किंवा मृत्यू दंड अशा शिक्षेची तरतूद केली आहे.त्या मुळे ड्रायव्हर ला गर्दीने मारणे हा सुध्दा गुन्हा त्यात येईल.
वाहन चालक पळून गेला असता अपघात ग्रस्त व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक यांना
नुकसानभरपाई मिळण्यासाठी फार अडचणी येतात.
वाहनाचा विमा काढला असतो .ती विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यासाठी जबाबदार धरले जाते.परंतु वाहन मिळाले नाही तर विमा कंपनी कोणती हा प्रश्न असतो म्हणून अपघातस्थळी वाहन मिळणे किंवा अपघाताची माहिती चालकाने पोलिसांना देणे अपघात ग्रस्त लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे .चालक हे पोलिसी खाक्याला सुद्धा घाबरतात त्या मुळे ते पोलिसांना माहिती देत नाही असेही एक कारण आहे.
गुन्ह्यात अडकून पडू अशीही भीती त्यांना वाटत असते.पण अपघात ग्रस्त व्यक्ती ला तातडीने दवाखान्यात नेले तर त्याचा प्राण वाचू शकतो ही जाणीव सुध्दा चालकांना हवी.
एकदरित परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारणे नविन थोडी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे.त्या मुळे
चालक संतापले आहेत.ते म्हणतात की
ब्रिटिश सरकारने सुध्दा अपघाता साठी कठोर शिक्षेची तरतूद केली नाही ते तर परकियच होते.तथापि ते न्याय शास्त्राचा आधार घेवून तरतूद करीत होते हे मात्र जाणवते.
शिक्षा देण्यासाठी न्ययशस्त्रात दोन पद्धती आहे एक म्हणजे जशास तशा शिक्षा गुन्हेगाराचे कुणाचा हात तोडला असेल तर त्याचाही हात तोडण्याची शिक्षा पद्धत दुसरी म्हणजे गुन्हेगार हा जन्मतः गुन्हेगार नसतो म्हणून त्यात सुधारणा करण्यासाठी शिक्षा देणे.
सध्या गुन्हेगाराची सुधारणे ही शिक्षा पद्धती आपण अवलंबिली आहे.
असे जर आहे तर इतकी कठोर शिक्षेची तरतूद का केली जाते.? हा प्रश्नच आहे.
अपघात स्थळी लगेचच आंब्युलेंस बोलविण्यासाठी सूचना दिली पाहिजे.१०मिनिटात अंबुलन्स आली पाहिजे. या साठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.ही जबाबदारी
पोलिसांवर सुध्दा टाकावी. अपघात ग्रस्त व्यक्तीचा प्राण कसा वाचेल ते आधी बघावे. ड्रायवरला कठोर शिक्षेची कारवाई हा उपाय होवू शकत नाही.
अनिल वैद्य २ जानेवारी २०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत