भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

राम भक्ती का धार्मिक उन्माद ?डॉ सुभाष देसाई, कोल्हापूर…

डॉ सुभाष देसाई कोल्हापूर
कोल्हापूर

राम भक्तीचा वापर करून 2024 ची निवडणूक जिंकायची लोकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचे हे तंत्र जगाच्या पाठीवर फक्त भारतात आणि त्यात फक्त भारतीय जनता पक्ष किंवा ब्राह्मण जनता पक्ष वापरू शकतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही.आजपर्यंत हिंदू धर्मशास्त्र अभ्यासणारे सगळे ग्रंथ आणि साऱ्या धार्मिक संस्था रामायण हे महाकाव्य आहे असे सांगत होते इतकेच नाही तर आज गुगल सारख्या सर्च इंजिनला तुम्ही विचारले तर ते सुद्धा एपिक आहेत महाकाव्य आहेत हे स्पष्ट करते आमच्या पूर्वजा पैकी कोणीतरी रामा सारखा शूर वीर होऊन गेला असेल त्याच्यामध्ये अनेक चांगले, सात्विक गुणही असतील आणि कालांतराने त्याला देवत्व लोकांनी दिले असेल त्याच्यात एक आदर्श हिंदू पाहिला असेल त्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा यालाही कोणी विरोध करणार नाही पण रामाच्या प्रतिमेचा वापर एखाद्या देशाची राजकीय सत्ता मिळवण्यासाठी करणे हे निंदनीय आहे .हे धर्माच्या भाषेत सुद्धा महापाप आहे आणि हे महापाल राष्ट्रीय सेवक संघ उघड उघड करतो आणि त्यातून त्याला सर्वधर्मसमभाव मांडणाऱ्या भारतीय राज्यघटनेला डावलून एकाच धर्माचा देश निर्माण करण्यासाठी राम मंदिराची योजना आहे. जर राम क्षत्रिय होता तर आता ब्राह्मणाशिवाय रामाची पूजा कोण करणार नाही हे कसे? शिवाय कोट्यावधी रुपये जे देशातून जमवले त्याच्यातून कोणाचा आर्थिक विकास होणार आहे तर मूठभर ब्राह्मणांचा .त्यामुळे पुरोहितांच्यासाठी हा धार्मिक उन्माद निर्माण केलेला आहे
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बुद्धीचे सुद्धा कौतुक करावेसे वाटते रामायण महाकाव्यातील राम. ही व्यक्तिरेखाच काल्पनिक असेल तर तिचा जन्मही काल्पनिकच म्हणावा लागेल आणि अशा रामाचा जन्म बाबरी मशिदीच्या व मूळ बुद्ध विहार जागी झाला हे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या बुद्धीचे दिवाळे वाजल्याचाच प्रकार आहे .हा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाला खाली मान घालायला लावणार आहे

जिथे राम नाही तिथे जन्म नाही आणि जिथे जन्म नाही तिथे त्याची मंदिर उभारणे हे सुद्धा काल्पनिक कथेसारखेच आहे
मला कोणीतरी सांगितले लिंगायत समाजातील धर्मगुरूंना राम मंदिराचे निमंत्रण आले आहे आणि त्याचा त्यांना फार अभिमान वाटतो मूळ समता सूर्य समाजवादी विचाराच्या श्री बसवेश्वरांच्या लिंगायत धर्मामध्ये मंदिरात जाणे किंवा मंदिरातील मूर्ती पूजन याला मान्यता नाही इष्ट लिंग पूजा करा हा बसवेश्वरांचा संदेश होता बसवेश्वर स्वतः ब्राह्मण असून त्यांनी ब्राह्मणांच्या कर्मकांडा विरोधात बंडखोरी केली हे जगजाहीर आहे असे असताना लिंगायत धर्मगुरूंना या निमंत्रणाची अपूर्वाई वाटण्याचे काहीच कारण नाही अनुभव मंडप स्थापून सर्व धर्माच्या लोकांना एकत्र करणाऱ्या बसवेश्वरांचेच विचार यावेळी त्यांनी साऱ्या समाजाला पुन्हा पुन्हा सांगायला हवेत
रावणाला मारण्यासाठी वापरलेल्या अजय बाणाची प्रतिकृती तयार झाली आहे पाच फूट लांब आणि बारा किलो वजनाचा हा बाण अहमदाबाद मध्ये तयार झाला कुणी रामाला पाहिले नाही कोणी रावणाला पाहिले नाही आणि रावणाला मारण्यासाठी वापरलेला बाण कसा तयार झाला ? साऱ्या भारताने एका काल्पनिक जगामध्ये किती वाहत जावे याला काही मर्यादा आहेत की नाही
आज मोदी अदानी भाई भाई अशा घोषणा चालले असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे आणि मूठभर लोकांच्या विशेषता गुजराती लोकांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ताब्यामध्ये संपूर्ण भारत दिला जावा या सगळ्याकडे लोकांनी कानाडोळा करावा म्हणून हा राम नामाचा धार्मिक उन्माद देशामध्ये सुरू झाला आहे हे देशाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीतून घातक आहे आज सर्वसामान्य माणसाला महागाईशी झुंजताना नाकी नऊ आली आहे रेल्वे बंदर विमानतळ पाणी वीज हे सगळे तुम्ही अदानी कडे का देता अदानी हा तुमचा अनावरासपुत्र आहे का जावई आहे हा सवाल आता नागरिकांनी थेट मोदींना विचारण्याची गरज आहे त्याचे काय उत्तर येते आपण वाट पाहू पण रामाचा बाण रामाच्या पादुका रामाचा मुकुट असल्या कपोल कल्पित जगात भारतीय जनतेने वावरू नये एवढीच विवेक वादी विज्ञाननिष्ठ भूमिका नव्या पिढीने जोपासायला हवी तरच लोकशाही भारतात जिवंत राहील अन्यथा जिम कॉम, जीपिंग, पुतीन ,डोनाल्ड ट्रम्प ,हिटलर, मुसोलिनी अशीच भूत भारताच्या छाताडावर नाचतील मग मात्र भारतीयांचा श्वास कोंडला असे म्हणू नका

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!