राम मंदिराचे राजकारण

तानसेन ननावरे
युनसायटेड रिपब्लिकन्स
भाजप राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे लोकसभा निवडणुकी साठी वापर करुन घेत आहे असा आरोप तथा चर्चा केली जाते
परंतु राम मंदिराचे राज कारण काँग्रेस आघाडी करीत आहे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या मंदिर सोहळ्यास सोनिया गांधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील गट नेते अधिरंजन चौधरी याना आमत्रण मंदिर कमेटीने दिले आहे
राम मंदिर उध्दाटन सोहळ्यास जाणार का नाही जाणार तर कोण कोण जाणार याची चर्चा न करता उडवाउडवीची उत्तरेदिली जात आहे अजून बराच वेळ आहे वेळेवर ठरवू
त्याच वेळी उदित राज व शकील अहमद ह्या काँग्रेस पक्षाच्या दलित व मुस्लिम नेत्याना राम मंदिर संदर्भात टीका टिप्पणी करावयास सांगितले जाते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार मंदिर निर्माण होत आहे राम मंदिर करोडो लोकांच्या श्रद्येचा आस्थेचा विषय आहे राम मंदिरा साठी रक्त सांडविल आहे मुल्ला यम सरकारच्या गोळ्या छातीवर झेलल्या आहे असे असताना उदित राज व डॉ शकील अहमद मनुस्मृतीचा विजय आहे पाचशे वर्षा नंतर मनुस्मृती पुन्हा प्रस्थापित झाल्याचे प्रतिपादन करुन काँग्रेस मंदिराचे राजकारण करीत आहे
कर्नाटकचे काँग्रेस पक्षाचे मंत्री डी सुधाकर याने राम मंदिर हा पुलवामा सारखा स्टंट आहे असे म्हंटले आहे
लालू प्रसाद यांच्या RJD पक्षाने राबडी देवीच्या घरावर पोस्टर लावले आहे त्यात त्याने म्हंटल आहे मंदिर का मतलब मानसिक गुलामगिरी
सोम्या गोम्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या संजय राऊत याने तर सर्वावर कडी केळी
संजय राऊत म्हणतात अब अयोध्या राम मंदिरसेही चलेगा मोदी सरकारका कारोबार यहि होंगा PM ऑफिस ओर BJP कार्यालय
काँग्रेस पक्षाला आमचा प्रश्न आहे काँग्रेसचा विरोध कुणाला आहे मोदी याना का रामाला रामाला विरोध करुन राम काल्पनिक आहे राम मंदिराच्या निर्मितीत अडथळे निर्माण केल्यामुळे दोन खासदार असलेला भाजप चारशे पार करीत आहे तर १३८ वर्षाची काँग्रेस रसातळाला गेली आहे
काँग्रेस पक्षाला भीती वाटते मुसलमान नाराज होतील काँग्रेसला मतदान करणार नाही परंतु हिंदू नाराज होतील मते देणार नाही अशी भीती काँग्रेसला वाटत नाही आणि तीच वाटली पाहिजे
मुसलमान भाजप ला मतदान करणार नाही तर तो काँग्रेसला मतदान करेन हा काँग्रेसचा भाबडा आशावाद चूक आहे मुस्लिम मतदार मूर्ख बेवकुफ नाही तर मुस्लिम मोदी व भाजपच्या पराभवासाठी मतदान करणार आहे भाजपचा पराभव करणारा उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो ममता अखिलेश उद्भव कोणत्याही पक्षाचा असो त्यालाच मतदान करणार
त्या मुळे काँग्रेस पक्षाने ठरवून घ्यावे कुणाची मते हवी आहे
पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी ह्या गांधी घराण्यातल्या एकानेही रामाचे दर्शन अद्याप घेतले नाही पण सोनिया गांधी ह्या पहिल्या गांधी कुटुंबातल्या व्यक्ती आहे त्याना मान सन्मानसह आमंत्रित करुन अयोध्या रामाच्या दर्शनाची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे
बघूया संधीचे सोने करतील का सोनिया
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत