मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापडलं जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर.

ज्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विसर्जन सोहळा असतो त्याच ठिकाणी या जिलेटिन कांड्या पोलिसांना मिळाल्या खाडीत २ बार्ज आढळून आले असून त्या कोणाच्या मालकीचे आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.
मुंब्रा रेतीबंदर परिसरात ठाणे पोलिसांना स्फोटकांचा साठा सापडला आहे. खाडीपाञात सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी हे साहित्य वापरले जाणार होते. त्याआधीच पोलिसांनी कारवाई करून हा सगळा साठा जप्त केलेला आहे. गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे १६ जिलेटिन कांड्या आणि १७ डिटोनेटर दोन पाडवांमध्ये मंगळवारी दुपारी सापडले. या खाडीपाञात सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी हे साहित्य वापरले जाणार होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा साठा हस्तगत केला.
मुंब्रा रेतीबंदर येथे सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करणारे पाडाव स्थानिक मच्छीमारांनी पकडले. यातील दोन पाडवांमध्ये संशयास्पदरित्या जिलेटीन व डिटोनेटरही आढळून आले आहे. पोलिस, संबंधित यंञणा आणि ठाणे तालुका पाणथळ समिती सदस्य रोहित जोशी यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत