चमत्काराचा भांडाफोड

१) तळहातावर लाल रंगाचा चमत्कार होणे
या चमत्काराचे विज्ञान समजून घ्या.
तळहातावर प्रथमच एक रसायन फेनाॅलफ्थेलीन लावलं होतं.अंगठ्याच्या मागिल बाजूस चुना म्हणजे अल्कली लावले होते.चुना आणि फेनाॅलफ्थेलीन या रसायनांची अभिक्रिया होऊन गुलाबी रंग तयार होतो.
२) गडूच्या साहाय्याने घरातील भूतबाधा काढणे
आपण गडव्यात तांदूळ टाकलेत.वरुन स्क्रुड्रायव्हरच्या साहाय्याने ठेचण्याची क्रिया केली.
यात गडवाच कां वापरला? कारण त्या गडवाचा आकार वर आणि खाली निमुळता आहे.ही पहिली गोष्ट.नंबर दोन,आपण तांदुळच कां घेतलेत? तांदळाचा आकार स्पटिकासारखा असतो.ठेचण्याची क्रिया केल्याने ते तांदुळ एकमेकांना घट्ट पकडले जातात.त्यांच्यात पोकळी राहत नाही.थोड्या वेळानंतर स्क्रुड्रायव्हर त्यात रोवला जातो.यासाठी सराव आवश्यक आहे.
३) अगरबत्तीची गिरकी
फुलपात्रात तांदूळ टाकले असता ते पात्रात मोकळेच असतात.आपण अगरबत्तीचे खालच्या लाकडी काडीचा भाग अगोदरच पीळ देऊन ठेवला होता.आपण मंत्र पुटपुटत राहतो आणि फुलपात्रात पाणी टाकीत राहतो.पाण्यामुळे पीळ दिलेला भाग पूर्ववत होण्याचा प्रयत्न करु लागतो,आणि आपणास अगरबत्ती फिरु लागते असे दिसते.
४) मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे
या चमत्कारात यज्ञ सामग्री म्हणून आपण जी रक्षा घेतो ती रक्षा नसून एक रसायन आहे,त्याचे नाव पोटॅशियम परमॅंग्नेट आहे,आणि त्यावर जे तूप टाकतो ते दुसरे रसायन आहे,त्याचे नाव ग्लिसरीन.दोघं रसायनांची अभिक्रिया होते.आॅक्सिजन पूरक अभिक्रिया होऊन अग्नी प्रज्वलित होतो.
५) अंगात आलेली व्यक्ती जळका कापूर खाणे
प्रथम अंगात येणे हे ढोंग असते किंवा स्वसंमोहन असते.समाजमान्य परिस्थिती आणि काही व्यक्तींचे प्रतिष्ठान बसविण्यासाठी तर काही व्यक्तींच्या शोषणापासून त्रासापासून सुटका होण्यास मदत मिळावी म्हणून देखील अंगात आणलं जातं.भूत पिशाच्च या कल्पनेने आधीच मनात स्थान असते.देवी अंगात येणे ही देखील समाजमान्य परिस्थिती आहे.
अंगात आल्यानंतर जळका कापूर खाणे ही क्रिया केली जाते.प्रथम कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे.नंबर दोन तो वरचेवर जळतो,नंबर तीन जळका कापूर एका हातावरुन दुसऱ्या तळहातावर काही सेकंदाच्या आत ही क्रिया करावी,कारण मानवी मेंदूला तीन सेकंदाच्या आत स्पर्श होत नाही,हे विज्ञान आहे.तोंडात टाकल्यास कार्बन डाय ऑक्साईड वायू पुरवठा होतो आणि तो विझतो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत