मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू.

मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून शनिवारी रात्री आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळल्यावर अग्निशमनदलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांना रेस्क्यू करुन वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेत हिरेन शाह (वय, ६०) आणि नलिनी शाह (८२) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू करुन काढलेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत