भीमा – कोरेगाव रणसंग्राम( खरा इतिहास )

संकलन –
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
भीमा कोरेगावच्या विजयाबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनी ‘ कोरे ‘ गावात भीमा नदीचे काठी एक विजयस्तंभ महार वीरांच्या विजयाचे प्रतीक म्हणून इ. स.1882 साली उभारला. त्यावर या युद्धात शहीद झालेल्या महार वीरांची नावे कोरली आहेत. ही लढाई महारांच्या जीवनातील अंधकार नष्ट करून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारी अशीच ठरली आहे. तो विजय- स्तंभ महाराजांच्या पुढील पिढीला आजही सामाजिक राजकीय चळवळी साकार करण्यासाठी प्रेरणा देत आहे. आणि सांगतो आहे ,हे नागवंशीयांनो तुम्ही झोपला असाल तर जागे व्हा आणि अन्यायाविरुद्ध चवताळून उठा “! जय स्तंभावर कोरलेली नावे –
भीमा कोरेगावच्या या अभूतपूर्व लढाईत जा शूरवीर महार सैनिकांच्या भरोशावर इंग्रजांना विजय प्राप्त झाला, त्यातील ज्या महार योद्यांनी रणांगणावर धारातीर्थी पडून आपला प्राण गमविला त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी तेथे एक जयस्तंभ उभारला आहे. त्यावर त्यांनी नावे कोरलेली आहेत. नायक असलेले वीर योद्धा खालील प्रमाणे –
सामनाक कमळनाक नाईक व रामनाक येसनाक नाईक आणि शिपाई असलेले गोंदनाक कोढोनाक, रामनाक येसनाक, भागनाक हरनाक, अंबनाक काननाक, रूपनाक लखनाक, गणनाक बाळनाक, बाळनाक कोंडनाक, वपनाक रामनाक, वीटनाक धाकनाक, राजनाथ गणनाक, वपनाक हरनाक, रैनाक वाननाक, गणनाक धर्मनाक, देवनाक आणनाक , गोपाळनाक बाळनाक, हरणाक हिरनाक, भीमनाक रतननाक, धाकनाक जेटनाक, धोनाक गणनाक, लखननाक जाननाक, हिरनाक या महार वीर योद्धांची नावे विजय स्तंभावर कोरलेली आहेत.
संदर्भ – पुस्तकं – भारतीय अस्पृश्यांची शौर्यगाथा. पृष्ठ. क्र.222. पैरा – मधला.
ही भीमा कोरेगावची लढाई सायंकाळपर्यंत एक सारखी चालत राहिली. समोरासमोर झालेल्या लढाईत महार शिपाई यांच्या तलवारीचे वाराने व हूल देऊन लढण्याच्या कौशल्याने पेशव्याच्या सैनिकांनी घाबरून कच खाल्ली. सायंकाळच्या अंधुक प्रकाशात एका बंदुकीची गोळी लागून सेनापती बापू गोखले याचा तरुण मुलगा गोविंदराव गोखले हा लढाईत मारल्या गेला. त्याचे डोके मांडीवर घेऊन तो ढसढसा रडू लागला. एक गोळी सु सु करीत येऊन बापू गोखले यांच्या उजव्या दंडाला लागली व तो जखमी झाला. तो आपला जीव वाचून आकाश मनाने घोड्यावर बसून विपरीत दिशेने पळून जाऊ लागला. आपला सेनापती लढाई सोडून पळून जात आहे हे पाहून इतरही मराठा सैनिक आपला जीव मुठीत घेऊन सैरावैरा सापडेल त्या दिशेने पळत सुटले. लढाई सोडून पळत असलेल्या मराठा शिपया वर ” महार ” सैनिक एकदम तुटून पडले. व आपल्या तलवारीचे सपासप वार करून त्यांची कत्तल सुरू केली. मराठा सैन्याचा पराभव केला. ” 1 जानेवारी 1818 ला झालेल्या ” भीमा – कोरेगाव ” युद्धात महार शिपायांच्या धैर्य व कर्तबदारीमुळे इंग्रजांना विजय प्राप्त झाला.
भीमा – कोरेगाव रणसंग्राम –
भीमा नदीच्या पलीकडे तीरावरील रणमैदानावर पेशव्यांची विराट सेना पाहून ब्रिटिश सेनापती कॅप्टन स्टाटन हा अगदी भांबावून गेला होता. परंतु पक्क्या निर्धाराने व इमानदार महार सैनिकाच्या भरोशावर हा लढा देण्याचे ठरविले. त्याच्याजवळ 50 हूलस्वार महार सैन्याच्या घोडदळाची एक छोटीशी तुकडी होती. तिच्या मदतीने पेशव्याच्या सैन्याला हुलकावण्या देऊन कोरेगाव खेड्यात प्रवेश केला. या गावाला चारही बाजूंनी माती- गोट्याची ऊस बांधलेली होती. त्या कुशीच्या आत आपल्या सैनिकाच्या ठिकठिकाणी मोक्याच्या जागी तुकड्या उभ्या करून मोर्चे बांधल्या गेले. त्याचवेळी त्यांचे जवळ मुंबई निगेटिव्ह इन्फट्रीचे 100 इंग्रज अधिकारी ,300 इंग्रज घोडदळ ,2 मोठ्या 206 पौंडी तोफा व काही हलक्या तोफा, 24 इंग्रजी तोफाची एक लहानशी हुलस्वाराची महार घोडदौड तुकडी आणि 500 महार पायदळ सैनिक एवढाच लवाजमा होता. भीमा नदीच्या अलीकडील किनाऱ्यावरून पलीकडील शिरूर गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील उंच जागेवर दोन मोठ्या 206 पौन्डी तोफा लावल्या, त्या ठिकाणावरून प्रचंड अशा पेशव्याच्या सैनिकावर अचूक मारा करता येत होता.
प्रेरणादायी युद्ध –
भारत देशात हजारो वर्षापासून गुलाम असलेल्या व तुच्छतेने जीवन जगणाऱ्या संपूर्ण अस्पृश्य समाजाला हा भीमा कोरेगाव संग्राम आत्मतेजाची व स्वाभिमानाची प्रेरणा देणारा ठरला. तसेच तो युद्धाचा प्रसंग माणुसकीची आणि सन्मानाची प्रेरणा देऊन गेला. असे म्हणावयास मूळीच हरकत नाही. आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायक ठरणार आहे. असे आमचे प्रामाणिक मत आहे.
भीमा – कोरेगाव या ठिकाणी महार वीरांच्या स्मृतिप्रतिर्थ बांधलेल्या विजयस्तंभावर ब्रिटिश कंपनीने एक वाक्य कोरले आहे one of the proudest Triumphs of British Army in the East.” पूर्वेकडील देशातील ब्रिटिश सैनिकांचा सर्वात गौरवशाली शानदार विजय ” असा उल्लेख केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या “Writing And Speeches Vol.1 page 261 वर उल्लेख करताना या विजयाबद्दल लिहितात – An Untouchable can not be engaged in incrative service. Military service had been the monopoly of the Untouchables since the day of East India Company. They had joined the Army in large numbers that the Marquins Tweedledale in his note which he submitted to the Indian Army commission of 1859 wrote ” It should never be forgotten that India was Conqured with the help of lowcaste men “.
मारक्वीन टीव्हीलडेल यांनी इ. स.1859 साली भारतातील ब्रिटिश सैन्य दलाला जो रिपोर्ट सादर केला त्यात असे लिहिले आहे की, अस्पृश्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांमध्ये सामावून घेऊ शकत नाही. कारण हिंदू त्यांना तुच्छ समजतात. परंतु सैन्यात घेता येते. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात अस्पृश्यांचा मात्र सैनिकी पेशात एक अधिकार होता. ते फार मोठ्या प्रमाणात सैन्यात दाखल झाले. हे कधीही विसरता येणार नाही की ,” भारताला पादक्रांत करण्यासाठी खालच्या जातीच्या लोकांचे फार मोठे सहकार्य लाभले”.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडीलाकडील चार पिढ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेत होत्या तसेच त्यांची आई भिमाबाई यांचे वडील व वडिलांचे सहाही भाऊ ब्रिटिशांच्या लष्करी सेवेत होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना लहानपणापासूनच लष्करी पेशाचे मोठे आकर्षण वाटत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण समजून घेण्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडील व आई या दोन्ही कडील अनेक पिढ्या लष्करी पेशात असल्यामुळे त्यांच्यात निर्भयपणा, लढावूकपणा व धडाडी आली होती. हा इंग्रजांनी अस्पृश्य वर्गाला दिलेल्या संधीचा फायदा होता असे म्हणावयास मुळीच हरकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे स्वतः जाऊन महार सैनिकांनी केलेल्या बलिदानाच्या प्रित्यर्थ उभारलेल्या विजय स्तंभाला मानवंदना देत असतं.
( सदर लिखाण हे भारतीय अस्पृश्यांची शौर्यगाथा या पुस्तकातून सादर.)
लेखक –
डॉ. कृष्णकांत डोंगरे सर.
नागपूर.
दि.31डिसें 23
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत