शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ वा स्मृतिदिन.

मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ वा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होणार आहे. या साथी शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला फुलांची आकर्ष सजावट करण्यात आली आहे. मध्यरात्री पासून या ठिकाणी येणाऱ्यांची रिघ लागली आहे. शिंदे गट, भाजप तसेच महाविकास आघाडीचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली. या संघटनेनं लाखो मराठीजनांना एक आवाज दिला. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं आज विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळ सज्ज झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकरते देखील या ठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत. यामुळे या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत