हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारयचा असेल तर त्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल

हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारयचा असेल तर त्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल,असे परिपत्रक गुजरात सरकारने काढले आहे,
एक तर तथा कथिथ हिंदू धर्म सोडून लोक का जात आहेत,याचे चिंतन सरकार किंवा आरएसएस चे ब्राह्माण यांनी करावे.
दुसरी बाब आपल्या धर्मातील वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था,असमानता , या ची चिकित्सा करायची नाही
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर यांना चिकित्सा करून सुधारणा करण्या साठी 21वर्ष दिले, तरी ये सुधारले नाहीत,कारण हा हिंदू धर्म नसून ब्राह्माण धर्म आहे,धर्म ग्रंथात कुठेच हिंदू धर्म नाही,तर ब्राह्माण धर्म आहे,तो वर्ण ,जात असमानता ,या वर आधारित आहे .पुढे डाव पेचाचा भाग म्हणून यास वैदिक धर्म,नंतर हिंदू धर्म आणि आता सनातन धर्म असे नाव बदलत गेले ,पण मसाला एकच आहे.
तो कधीच बदलणार नाही,
तो टिकून च आहे जाती व्यवस्था वर.
बाबसाहेब आंबेडकर यांना हे माहीत होत,की पुढे हे असे परिपत्रक काढण्याचे नाटक करतील म्हणून त्यांनी
घटनेतील मूलभूत हक्क यात कलम 25 मध्ये नमूद करून ठेवले की या देशातील कोणता ही नागरिक कोणता ही धर्म ,स्वीकारू शकतो ,त्याची पूजा ,उपासना ,प्रचार प्रसार करू शकतो,
त्या मुळे असे परिपत्रक दिखावा आहे, मूळ घटनेतील तरतुदी पुढे या परिपत्रक कचरा पेटीतील कचरा आहे .याला कोणी भीक घालणार नाही
बुद्ध म्हणजे ज्ञानी होणे आहे.
ज्ञानी होण्या साठी कोणाची परवानगी घेण्या साठी आता
रामायणातील शंबुक किंवा महाभारतातील एक लव्य
या काल्पनिक कथा चे दिवस नाहीत,
सर्व जग बुद्ध स्वीकारते,आणि गुजरात ,परवानगी घ्या म्हणते?.भारताचे प्रधान मंत्री,जे गुजराथ चे रहिवाशी आहेत,त्यांनी विदेशात जाऊन सांगितल की मी बुध्द देशातून आलो आहे,आणि आधुनिक जगातील अशी एक ही समश्या नाही ,की ज्याचे निराकरण बौद्ध धम्म यात नाही.
आणि हेच गुजरात असे परिपत्रक काढून हसू करून घेत आहे.याला कोणी भीक घालणार नाही.तुम्ही कोणी रोखू शकत नाही.हा देश बौध्द देश आहे.
या परिपत्रकाचा जाहीर निषेध ,पण बाबासाहेबांनी सांगितल,मी भारत बौद्ध मय करीन,आणि होत आहे.
उत्तम सोनकांबळे
प्रादेशिक सहसंचालक लेखा व कोषागारे,से.निन
रा.नांदेड.9503583589
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत