आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आर्थिक अभ्यासवर्ग

संकटे किंवा वाईट बातम्या एकट्या येत नाहीत , झुंडीने येतात असे म्हटले जाते. भारतीय शेअर मार्केट सध्या त्याचा अनुभव घेत आहे.

सेन्सेक्स ऐतिहासिक ८६,००० अंशावरून ७५,००० वर लुडकला आहे.

रुपया डॉलरचा विनिमय दर वेगाने घसरून ८८ ला स्पर्श करून आला. अजून घसरू शकतो.

परकीय गुंतवणूकदार संस्था गेले काही महिने सातत्याने भारतीय शेअर्स मधून गुंतवणुकी काढून घेत आहेत.

देशातील म्युच्युअल फंडात मध्यमवर्गाने बरेच पैसे गुंतवले. त्यामुळे परकीय गुंतवणूकदार जाण्याचा इम्पॅक्ट एवढा जाणवला नाही. पण अनेक म्युचल फंड योजना आधीसारख्या रिटर्न देत नाहीयेत. परिणामी म्युच्युअल फंडाकडे येणारा ओघ आटू शकतो.

वित्तीय वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात भारतीय कंपन्यांनी केलेली विक्री आणि कमावलेला नफा अपेक्षेपेक्षा कमी आहे. नफा न वाढल्यामुळे शेअर्स किंमती वाढत नाहीत. शेवटच्या तिमाहीत काही नाट्यपूर्ण घडेल अशी अपेक्षा नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांची तलवारबाजी एवढ्यात थांबेल , असं नाही. भारत त्यांच्या अजूनही हिट लिस्टवर आहे.

अमेरिकेतून आयात वाढली तर त्याचा परिणाम भारतीय उद्योगांवर होऊ शकतो. उदाहरणार्थ , टेस्ला कार्स या टाटा मोटर्स, महिंद्राचा धंदा खाऊ शकतात.

जागतिक पातळीवर भू राजनैतिक, लष्करी संदर्भ वेगाने बदलत आहेत. ते नजीकच्या काळात स्थिर होतील , अशी शक्यता कमी आहे.

आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरील सर्व घटना सुट्या सुट्या घडत नाहीत. त्या परस्परांवर प्रभाव टाकत असतात. उदाहरणार्थ , रुपया घसरण्याचा आणि परकीय गुंतवणूकदार जाण्याचा परस्पर संबंध आहे.


        आपल्याला कल्पना नाही, पण व्यक्त भांडवलशाहीची प्रचंड दहशत आहे. ती राज्यकर्ते आणि धोरणकर्त्यांना माहीत असते. 

       प्रॉब्लेम हा आहे की शेअर मार्केटबद्दल , एकूणच अर्थव्यवस्थेबद्दल कोणीही निगेटिव्ह बोलू इच्छित नाही. रिझर्व बँक, सेबी,  राजकीय नेते, शासकीय प्रवक्ते यांच्यावर पॉझिटिव्ह बोलण्याची सतत दडपण असते. त्याला “टॉकिंग अप द मार्केट” असेच म्हणतात. 

    शेअर मार्केट मधील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनो ! मी लिहिले म्हणून देखील मानू नका. स्वतः माहिती घेऊन मते बनवण्याची सवय लावा. त्याला काही पर्याय आणि शॉर्टकट नाही. 

संजीव चांदोरकर (२२ फेब्रुवारी २०२५)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!