“आता बाबा हयात असते तर ?”

नका उभारू इमले कल्पनेचे,
नका मांडू विचार अवास्तवतेचे,
असते जर बाबा हयात,
पुढारी अनुयायांना, भरचौकात दिले
असते फटके, चाबकाचे .!
तहहयात उपसले, कष्ट अतोनात,
न क्षणभर विसावलो,
उभ्या आयुष्यात,
असता पदव्या,
अनेकानेक स्वतःपाशी,
भिडलो मी एकांगी हिमालयाशी,
आरोप सहीले देशद्रोहाचे,
काम केले, बहिष्कृतांच्या उत्थानाचे.!
ना भीक घातली धमक्याना,
नच बळी पडलो आमिषाना ,
ठोकरले धन दौलतीला,
दुर्लक्षिले कुटुंबाला,
वैयक्तिक सुख समृद्धीला.!
दिली कवच कुंडले संविधानाची,
समता, स्वातंत्र्य, समानतेची, ,
ठेवल्या जागा राखीव,
ठेवली करून, सोय प्रगतीची.!
करून इतके सर्व, माझ्या माघारी,
” मीच आंबेडकर” मनात तुमच्या संचारी,
लागलीय स्पर्धा भारी,
एकमेकांचे पाय खेचण्यापरी!
थाटली दुकाने, माझ्या नावाची,
गरज भासे प्रत्त्येका, मज फोटोची,
करीती सौदा गोर गरिबांच्या मतांची,
करून ठेवलीय,
वाताहत दिन दुबळ्या जनतेची.!
ठेवलाय विखरून, समाज दारोदारी,
चळवळीने घेतलीय,
हाती भिकेची कटोरी,
एखाद्या पदासाठी,
बांधलाय समाज,
सत्ताधाऱ्यांच्या दारी.!
बांधलाय समाज,
सत्ताधाऱ्यांच्या दारी.!!
बांधलाय समाज,
सत्ताधाऱ्यांच्या दारी.!!!
जयभीम.
अरुण निकम.
9323249487.
मुंबई…
दिनांक…11/08/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत