गोटखिंडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

सांगली दि. ११ (प्रतिनिधी) गोटखिंडी (ता. वाळवा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला रमेश कांबळे यांच्या हस्ते तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला सर्जेराव कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बौद्धाचार्य सचिन कांबळे यांनी सामुदायिक बौद्ध वंदना घेतली रमेश कांबळे, शरद एटम, दैनिक सम्राट जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कांबळे, सचिन कांबळे, सुनंदा धेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्या व ग्रामपंचायत सदस्या राजश्री एटम यांची भाषणे झाली. यावेळी त्यांनी थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगितले. यावेळी नंदकुमार धेंडे, प्रकाश एटम, शरद एटम, बालाजी वर्धन, डॉ.सुधाकर कांबळे, डॉ. आनंद वर्धन ,भीमराव एटम, तानाजी एटम, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शरद एटम यांनी आभार मानले. शेवटी त्रीसरण पंचशील घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत