
क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे अशी माहिती, क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी, हा दरवर्षी “राज्याचा क्रीडा दिन” म्हणून साजरा होणार आहे. य़ा आधी प्रत्येक जिल्हयाला, १० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते.
खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्कारांचं वितरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन समावेश आहे. क्रीडा प्रेमींनी यामध्ये उत्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहनही संजय बनसोडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत