निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिंदे गटात; “कार्यकर्त्यांना दिशा दाखवण्यासाठी प्रवेश करतोय” असे प्रतिपादन

मुंबई : काँग्रेस ची बाजू सर्व चर्चांमध्ये भक्कम पणे मांडणारे काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेससह मविआला मोठा धक्का बसला.

काँग्रेसची सध्या चाललेली फरपट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करतेय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मुंबईची जागा मागितली. मात्र त्यांच्यावर दबाव आणत त्यांना बाहेर काढण्यात आलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडत सांगावं लागतंय, की सीट आमची आहे. भिवंडीची सीटही शरद पवार यांनी थेट जाहीर केली. याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर होतोय. काँग्रेस कार्यकर्त्यांना दिशा दाखवण्यासाठी मी शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे.” असं वाघमारे यावेळी म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!