जनता साप्ताहिक 🧾📰📰२४ नोव्हेंबर १९३०
कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा निघालेले वृत्तपत्र – पाक्षिकांची नावे
१_ मूकनायक:३१ जानेवारी १९२०
२_ बहिष्कृत भारत:३ एप्रिल १९२७
३_ समता:२९ जून १९२८
४_ जनता:२४ नोव्हेंबर १९३०
५_ प्रबुद्ध भारत:४ फेब्रुवारी १९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्याची सुरुवात १९१९ साली केली होती. त्यांनी वृत्तपत्रीय कारकीर्द मात्र १९२० साली सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. त्यांचे पहिले मुखपत्र मूकनायक पाक्षिक हे ३१ जानेवारी १९२० साली सुरू झाले. त्यानंतर बहिष्कृत भारत पाक्षिक हे ४ नोव्हेंबर १९२७ साली सुरू झाले, बहिष्कृत भारत सुरू असताना जनता हे पत्र सुरू करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोत्साहन दिले, कारण बहिष्कृत भारत असे पत्राचे नाव असल्यामुळे अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणी वाचत नाहीत म्हणून पत्राचे नाव बदलून जनता पाक्षिक २४ नोव्हेंबर १९३० रोजी सुरू केले गेले. जनता पत्राची जबाबदारी दे. वि. नाईक, भा. र. कद्रेकर, अनंतराव चित्रे, गं. नी. सहस्रबुद्धे आदींनी समर्थपणे सांभाळली आहे. जनता पात्रासाठी लेखन करण्याचे कामही ही मंडळी करीत असतं. तथापि, जनतेच्या खास आग्रहाखातर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जनता पात्रासाठी मजकूर द्यावा लागे. मधून मधून ते जनतेसाठी लेखन करीत असत. या लेखनाची जाहिरातही जनता मधून देण्यात येत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन पहिल्या पृष्ठावर जाहीर केले जात असे. अग्रलेखाच्या जागी विशेष महत्त्व देऊन छापले जात असे. या लेखनाच्या खाली A हे इंग्रजी अक्षर टाकण्याची प्रथा होती. बाबासाहेबांच्या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे ही भाषणे ते स्वतः लिहून तयार करीत. त्या भाषणाची वा लेखाची पुस्तिकाही प्रसिद्ध होत असे. जी भाषणे अगोदर लिहून काढलेली असत. त्यामुळे त्यात वक्तृत्वाचे गुण असले तरी त्याला निबंधाचा दर्जा प्राप्त होत असे. त्यादृष्टीने त्यांचे ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झालेले बार्शी येथील देशांतर, नामांतर की धर्मांतर किंवा मुंबई इलाखा महार परिषदेत केलेले मुक्ती कोन पथे ? हे भाषण किंवा जातपात तोडक मंडळात देण्यासाठी तयार केलेले Annihilation of Caste हे इंग्रजी भाषण Ranade, Gandhi & Jinah हे रानड्यांच्या जयंती समारंभ निमित्त केलेले इंग्रजी भाषण ही उदाहरणे म्हणून सांगता येतील. तसेच २८ जानेवारी १९५६ चा जनता साप्ताहिकाचा ३९ वा हा शेवटचा अंक होता. सुमारे पाव शतक आंबेडकरी चळवळीचे गॅझेट म्हणून जनता पत्राने केलेले कार्य केवळ असाधारण आहे. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण कालखंडात म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेपासून मजूरमंत्री, भारताचे पहिले कायदेमंत्री व संविधानकार म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते पर्यंत एवढेच नव्हे तर बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करेपर्यंत त्यांची चळवळ जनसामान्यांपर्यंत नेण्याचे साधन म्हणून जनता साप्ताहिकाचे कार्य केले हे केवळ असाधारण कार्य होय. जनता पत्र १९३० ते १९५६ एवढा काळ म्हणजे जवळ जवळ २५ ते २६ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याचे चळवळीचे पीठ होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा कालखंड या पत्रामध्ये व्यक्त झालेला आढळतो.जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते.
जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘ गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल ’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती. परंतु चळवळ अजून संपलेली नाही आहे. बाबासाहेबांच्या अनुयायांना जनता पत्रातील महत्त्वपूर्ण लेख या पुस्तकात वाचनात येतील.
📚संबोधी बुद्धिझम पालि बुक सेंटर बदलापूर
उपासक: रॉकेश यादव(महाड)
संपर्क 📲 ९५७९८१६२३०
🙏📰 ज 📰 न 📰 ता 📰🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत