उसापासून इथेनॉलनिर्मितीस केंद्राची मंजुरी

गेल्या हंगामात ३८ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली गेली होती. यावेळेस निर्बंध नसते तर ४५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाण्याचा अंदाज होता. यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर २०२३-ऑक्टोबर २०२४) कमाल १७ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. संभाव्य साखरटंचाई लक्षात घेऊन केंद्राने ७ डिसेंबर रोजी उसाचा रस आणि सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास या हंगामासाठी बंदी घातली होती. त्यामुळे साखर उद्याोग क्षेत्रात नाराजी व्यक्त होत होती. शुक्रवारी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने काढलेल्या नव्या परिपत्रकात, निर्बंध शिथिल करून १७ लाख टन साखर बनू शकेल एवढा उसाचा रस किंवा सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन होईल, तसेच बी हेवी मोलॅसिसपासूनही अतिरिक्त इथेनॉल उत्पादन घेता येईल असे नमूद करण्यात आले आहे. साखर उद्याोगातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्या, साखर कारखानदार आणि डिस्टिलरी यांनी २६० कोटी लिटर इथेनॉल, थेट उसाचा रस आणि मोलॅसिसमधून प्रत्येकी १३० कोटी लिटरचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत