धम्म आणि नीती—


धम्मात नीतीचे स्थान कोणते ?
. याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे, म्हणजे नीती म्हणजे धम्म
आणि धम्म म्हणजे नीती.
दुसऱ्या शब्दांत बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी
त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे .
धम्मात प्रार्थना तीर्थयात्रा कर्मकांड,
विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही.
नीती हे धम्माचे सार आहे.
त्याशिवाय धम्म नाही.धम्मात
माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो.
त्यासाठी देवाच्या आज्ञांची आवश्यकता नाही.
देवाला संतुष्ट करण्यासाठी काही
माणसाने नीतिमान व्हायचे नाही.
तर स्वहितासाठीच माणसाने
माणसावर प्रेम केले पाहिजे.
केवळ नीती पुरेशी नाही,ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे
नीतीला पावित्र्य देण्यात तीन घटक
कारणीभूत झाले असावेत.
पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण
करण्याची सामाजिक हिताच्या
दृष्टीने आवश्यकता.
ह्या प्रश्नांची पार्श्वभूमी “जीवनकलह “
आणि जीवनसंघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत,या
सिद्धान्तात आहे.
ह्या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की,मानवसमाजाचा विकास जीवनसंंघर्षामुळे घडला,कारण प्रारंभिक युगात अन्नसामुग्री अति
मर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाने
दात आणि नखे रक्तलांच्छित आहेत
अस म्हणतात.
या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरु शकतात
ही समाजाची प्रारंभीची स्थिती झाली.
जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक
शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे.
याच उत्तरात नीतीचा उगम आणि
आवश्यकता सामावलेली आहे.
प्रारंभी हे निर्बंध योग्यतम (सर्वात अधिक शक्तिमान ) माणसाला लागू
केल्यामुळे ते पवित्र हे मानण्याची
आवश्यकता होती.
यापासून होणारे परिणाम फार गंभीर
स्वरूपाचे आहेत. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि
आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण
करणारे असते. ही नीती म्हणजे एका
विशिष्ट समूहाच्या हीताचे संरक्षण
करण्यापुरतीच मर्यादित म्हणजेच
समाजहित –विरोधक असते.
याप्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाजविरोधक रुप अगदी उघडे करतात.
अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती —
नियमांची आवश्यकता असते.
दुसरे असे की समुह व्यवस्थेमुळे समाजात पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही.
समुह व्यवस्थेमुळे समाजात वर्गप्रधान थर बनतात . जे मालक ते मालकच राहातात आणि जे दास्यात जन्म झाला ते दासच राहातात. धनी ते धनीच राहातात कामगार ते कामगारच राहतात. अधिकारसंपन्न तएअधइकआरसंपन्नच राहतात आणि
गुलाम ते गुलामच राहतात.
याचा अर्थ असा की अशा अवस्थेत स्वांतत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो
सर्वांना होत नाही.
अल्पसंख्यांकांना समतेचा लाभ होतो
बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते.
या वर उपाय काय ?
यावर उपाय म्हणजे बंधुता,ही सर्वप्रभाव पडणारी शक्ती बनविणे
बंधुता म्हणजे काय ?
बंधुता म्हणजे मानवमानवातील
भ्रातृभाव म्हणजेच नीती.
म्हणूनच तथागत बुद्धांनी शिकवले
“धम्म म्हणजे नीती आणि धम्म
पवित्र आहे, तशीच नीतीही पवित्र
आहे “
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत