महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच….


कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि तुंम्हाला कमी लेखण्याची संधी शोधू लागतात.

मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे,गैरजिम्मेदारीचे, असे लोक आपल्याला अप्रत्यक्ष विरोध करत असतात, तुमच्यातला चांगुलपणा झाकुन,तुंम्ही किती वाईट आहात हे दाखविण्यासाठी तुमच्यातल्या ऊनिवा ओरडुन सांगत छुप्या चर्चा सुरु होतात !
सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाहीत ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. खरे नुकसान हे या क्षणाला होते.
अशावेळी शांत रहाने ही समंजस पणाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात.
यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण.
आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत रहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. तुमच्या शांत रहाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.
द्वेष भावनेने तुमच्यावर आरोप करणाऱ्यांचे तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचनारांचे कालांतराने पितळ उघडे पडतेच आणि सत्य काय ते समाजाला समजते.त्यांना प्रति उत्तर न, देता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचा वेळ आपल्या कार्यात लावल्याने तुंम्ही बरीच प्रगती केलेली असते तर जे तुमच्या सतत प्रगतिशील वाटचालीस पहात त्यांच्या कुटिल वृत्तीमुळे पारावरच हात चोळत जैसे थे स्थितित रसातळाला जात असतात व काळ त्यांना योग्य ती शिक्षा देत असतो
शेवटी काय तर ”आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ”पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ”माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे. लोकांचे काय ते तर देवालापण गरजेपुरत पुजतात
जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही.
तेंव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात.
त्यामुळे
प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,
कधीकधी एकटे पण लढावे लागते,पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील
मानुसकीसाठी एक पाऊल पुढे….!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!