चेन पुलिंग करणाऱ्या 793 प्रवाशांना दंड प्रवासा.

मध्य रेल्वे मार्गावर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ७९३ जणांनी कारण नसताना साखळी खेचली. या सर्वांकडून २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई विभागात कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कसारा, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि आंबिवली – टिटवाळा येथे साखळी खेचण्याच्या घटना वारंवार घडतात.दरम्यान संकटकाळ उद्भवल्यास मदतीसाठी साखळी खेचण्यास मुभा आहे, गरज नसतानाही साखळी खेचण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे एकूण १०७५ गाड्या उशिराने धावल्या. यामध्ये मुंबई विभागातील ३४४ मेल/एक्स्प्रेस गाड्या, भुसावळ विभागात ३५५ गाड्या, नागपूर विभागात २४१ गाड्या, पुणे विभागात ९६ गाड्या विभाग आणि सोलापूर विभागात ३९ गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये ७९३ व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेवर मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचे ८.२९ टक्के वक्तशीरपणावर परिणाम होतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत