अग्निसुरक्षा लेखापरीक्षणासाठी भरारी पथके

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) सर्व उंच इमारती, व्यावसायिक अस्थापनांसह सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमधील अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणामंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
विधान परिषदेत शुक्रवारी सदस्य प्रसाद लाड यांनी एमएमआरडीएतील आगीच्या विविध घटनांचा दाखल देत राज्य सरकार आणि महापालिका आगीच्या घटना टाळण्यासाठी काय उपाय योजना करणार आहे. संबंधित इमारतीत अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाबाबत ठोस निर्णय घेणार आहे का. इमारतींचे मालक, भोगवटादार आणि गृहनिर्माण संस्थांनी अग्नी सुरक्षा लेखापरीक्षण करून घेतल्याची तपासणी कशी करणार आहात, अशी विचारणा केली होती. सरकारच्या वतीने उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) सर्व उंच इमारतींचे इमारतींची अग्निसुरक्षा लेखापरीक्षण तपासणीसाठी आणि प्रत्यक्षात अग्निशमन यंत्रणा त्या इमारतीत आहे का याची खातरजमा करण्यासाठी भरारी पथके नेमली जातील. ही भरारी पथके अचानक भेटी देऊन तपासणी करतील. अनेकदा सरकारी यंत्रणेमार्फत अग्निसुरक्षा लेखापरीक्षण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. पण, प्रत्यक्षात लेखापरीक्षण केले जात नाही. अशी बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सर्व उंच इमारतींचे वर्षातून दोन वेळा अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी घोषणाही सामंत यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत