नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती

माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांची महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पडसलगीकर यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी राहणार आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पडसलगीकर यांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.  पडसलगीकर भारतीय पोलीस सेवेतील १९८२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. नागपूर, कराड, नाशिकमध्ये त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात ते पोलीस अधीक्षक होते. ते मुंबई पोलीस आयुक्त होते. मुंबई पोलीस आयुक्तपद भूषविल्यानंतर पडसलगीकर यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!