मुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय राज्यघटना आपण भारतीय आहोत म्हणून भारताचा इतिहास माहिती असणे काळाची गरज आहे .

गांधी काॅग्रेस आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना कट्टर विरोध असतांना सुध्दा डाॅ. आंबेडकर हे भारताच्या संविधान सभेवर कसे निवडून गेले ?
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९१६ ते १९४२ म्हणजे २६ वर्षे संघर्ष करून भारतातील सर्व अस्पृश्यांना जागृत करून संघटित केले , आणि दि.१८/१९ आणि २० जुलै १९४२ ला या सर्व अस्पृश्यांचे नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन घेतले , त्यामध्ये ७५,००० कार्यकर्ते उपस्थित होते , त्यामध्ये ५०,००० पुरूष व २५,००० महिला होत्या , अस्पृश्य वर्गामधील १५०० जाती होत्या , त्या सर्व जातींना जागृत करून जोडण्याचे महाकठीम काम डाॅ. आंबेडकरांनी केलं .
त्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्तर भारतातील गोरे अस्पृश्य , मध्ये भारतातील सावळे अस्पृश्य , दक्षिण भारतातील काळे अस्पृश्य , अशा सर्व अस्पृश्यांना एकत्र केले . थोडक्यात एक राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केले , या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा पाया त्यांनी अस्पृश्यांना बनविले .
ज्यावेळी काॅन्ग्रेस + गांधीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नाही . त्यावेळी बंगाल मधील लोकांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमधून संविधान सभेची निवडणूक लढविण्याची विनंती केली .
मुस्लीम लीगचा मनुष्य जिथून निवडून जायचा त्याने बाबासाहेबांसाठी ती जागा सोडली . नमोशुद्रा या जातीच्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांना मते दिली .व महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला ,आणि काॅग्रेस व गांधीचा कट्टर विरोध असतांनासुध्दा बाबासाहेब त्यांच्या छाताडावर पाय देऊन संविधान सभेत निवडून गेले .
हे बाबासाहेबांनी २६ वर्षे संघर्ष करून निर्माण केलेल्या देशव्यापी , राष्ट्रव्यापी भारतव्यापी आंदोलनामुळे शक्य झाले .
बाबासाहेब संविधान सभेवर निवडून आले हे गांधी व त्यांच्या काॅग्रेसला सहन झाले नाही , म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूने ज्या ४ (चार) जिल्ह्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून पाठवले ते चारही जिल्हे – (१) . जस्सोर (२). खुलना (३). बोरीशाल आणि (४).फरिदपूर हे चार जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले . आजही भारताचा व पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर हे चार जिल्हे ज्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून पाठविले, ते जिल्हे आता पाकिस्तान मध्ये आहेत .
पंडित नेहरूने या चार जिल्ह्यांवर सूड उगवला . त्या चार जिल्ह्यांचा दोष एवढाच की त्यांनी बाबासाहेबांना – मानवतेच्या मुक्तिदात्याला संविधान सभेत निवडून पाठविले.
ज्या मतदार संघातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर निवडून आले त्या मतदार संघातील चारही जिल्ह्यांना पंडित जवाहरलाल नेहरूने पाकिस्तानात टाकले. कोणत्या नेहरूने ?
ज्यांना आम्ही पंडित म्हणतो , ज्यांना आम्ही महान समाजवादी म्हणतो , ज्यांना आम्ही अधुनिक भारताचे निर्माते म्हणतो ,
एवढेच नाही तर ज्यांना आम्ही बच्चों के चाचा असेही म्हणतो .
त्या पंडित नेहरूने सूडाच्या भावनेने भारतातल्या चारही जिल्ह्यांना पाकिस्तानात टाकले .
भारत – पाक फाळणीची अट खालील प्रमाणे होती .
ज्या विभागामध्ये ५१% पेक्षा जास्त हिंदू असतील तो भाग भारतात ठेवायचा व ज्या विभागामध्ये ५१% पेक्षा जास्त मुसलमान असतील तो भाग पाकिस्तानला द्यायचा . ज्या चार जिल्ह्यांनी बाबासाहेबांना , गांधी + काॅन्ग्रेसच्या नाकावर टिचून संविधान सभेत निवडून पाठविले त्या चार जिल्ह्यांमध्ये मध्ये
(१) जस्सोर
(२) खुलना
(३) बोरिशाल , आणि
(४). फरिदपूर मध्ये ७१% हिंदू होते .
खरे तर हे चारही जिल्हे भारतातच ठेवायला हवे होते . परंतू त्या पंडित नेहरूने शिक्षा म्हणून हे भारताचे चार जिल्हे पाकिस्तानला दिले .
ज्या चार जिल्ह्यातील लोकांनी बाबासाहेबांना मते देवून संविधान सभेत निवडून पाठविले – आज युरेशियन ब्राम्हण लोक त्यांना बांगलादेशी घुसखोर म्हणतात व बांगला देशातील लोकंही त्यांना सहारा देत नाहीत .
“इकडे आड तिकडे विहीर ” अशी स्थिती त्या लोकांची झाली आहे .
सर्वात महत्वाचे म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत निवडून पाठविणारे चारही जिल्हे पाकिस्तानला दिल्यामुळे डाॅ. आंबेडकर हे पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले . भारतीय संविधान सभेचे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले .
व नंतर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले . व त्यांनी इंग्रज पंतप्रधान विस्टन चर्चिलची भेट घेतली . परंतू काही उपयोग झाला नाही .
त्यानंतर बाबासाहेबांनी गांधी+काॅग्रेसच्या संविधानाला मी मान्यता देणार नाही अशी भूमिका घेतली .
इ.स. १९४६ लाॅर्ड वेव्हेलने लंडनच्या रेडिओवरून एक घोषणा केली होती की, ” आता आम्ही जास्त काळ भारतात राहणार नाही , परंतू आम्ही भारत सोडून जाण्यापूर्वी भारतातील लोकांनी मिळून मिसळून संविधान बनविले पाहिजे .
यात भारतातील सत्तेचे तीन वाटेकरी असतील , खालिल प्रमाणे
(१).सवर्ण, (२).अस्पृश्य, (३).मुसलमान.
त्यावेळी भारतात तीन छावण्या होत्या .

(१) सवर्ण छावणी नेता – गांधी.

(२) अस्पृश्य छावणी नेता -डाॅ. आंबेडकर.

(३) मुस्लिम छावणी नेता – बॅ. जीना .
दरम्यानच्या काळात डाॅ. आंबेडकरांनी संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता – व बहिष्कार टाकतांना त्यांनी म्हटले होते की – SC, ST, OBC ,NT , DNT ,VJNT ला संवैधानिक सुरक्षा मिळाली तरच अर्थात ” Constitutionl Safe Guards ” मिळाले तरच आम्ही संविधानाला मान्यता देऊ .
इकडे नेहरूला प्रधानमंत्री बनण्याची घाई झाली होती .
इंग्रजांनी , वरील तिघांनी मिळून संविधान लिहण्याची अट घातली होती आणि डाॅ. आंबेडकरांनी संविधान प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता . करायचे तर काय करायचे ? काॅन्ग्रेस व गांधी पुढे धर्मसंकट निर्माण झाले .
तेंव्हा
गांधीने नेहरूला सल्ला दिला .
गांधी : नेहरू,डाॅ.आंबेडकर क्या चाहते है?
नेहरू: अपनें लोगों केलिए संवैधानिक सुरक्षा ।
गांधी : प्रधानमंत्री कौन बननेवाला हैं ?
नेहरू : मै. मैं ही प्रधानमंत्री बननेवाला हूॅ ।
गांधी : संविधानपर अंमल कौन करेगा ?
नेहरू : मैं हि करूंगा ।
गांधी : तो ऐसा करो , डाॅ.आंबेडकर को संविधान लिखनेकी जिम्मेदारी दे दो । उन्हें जो जी चाहें लिखने दो । उसपर अंमल करना हैं या नहीं करना हैं यह तुम देख लेना ।
आणि मग नेहरूचे डोळे चमकले . त्याला अत्यानंद झाला , त्यावेळी त्याला खरे गांधी कळाले .
लगेच नेहरूने बॅ. जयकरांना मुंबईमधून द्यायला लावला व त्याच्या जागेवर डाॅ. आंबेडकरांना निवडून आणले व संविधान मसुदा समितीचे अध्यक्षही बनविले .

दोन समित्या नेमल्या

(१) मसुदा समिती अध्यक्ष -डाॅ.आंबेडकर
(काम कलम लिहणे )

(२)घटना समिती अध्यक्ष- डाॅ.राजेंद्रप्रसाद.
( काम कलम मंजूर करणे .)
गांधी – काॅग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा , विचार – विमर्श किंवा सल्ला मसलत काहीच केली नव्हती .
“तुम्ही तुमच्या लोकांसाठी संवैधानिक सुरक्षा पाहिजे म्हणता ना – मग तुम्हीच मसुदा समितीचे चेअरमन व्हा आणि काय हवी तेवढी संवैधानिक सुरक्षा घ्या
गांधी + काॅन्ग्रेसचा हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अडचणीत आणण्याचा डाव होता . परंतू गांधी + काॅग्रेसला काय माहित की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर गांधी आणि काॅग्रेसचे बारसे आधीच जेवून बसले होते .
खरे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना हेच हवे होते . म्हणून त्यांनी जाणिवपुर्वक संविधान निर्माण प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता.
थोडक्यात डाॅ. आंबेडकरांनी हवे ते मिळविण्यासाठीच हा डाव खेळला होता . त्यात डाॅ. आंबेडकर यशस्वी पण झाले .
गांधी आणि काॅग्रेसचे चेलेचपाटे बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून जाऊ देऊ इच्छित नव्हते , आंबेडकरांसाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडू इच्छित नव्हते .
आंबेडकर इथल्या बहुजन समाजाला संवैधानिक सुरक्षा दिल्याशिवाय संविधानाला मान्यता देत नव्हते , हा पेच निर्माण झाल्यामुळे गांधी आणि काॅग्रेसने डाॅ. आंबेडकरांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनविले
अशा तर्हेने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले .
सात जणांची समिती नेमली
(१) अध्यक्ष – डाॅ. बी. आर. आंबेडकर .
(२) सदस्य – अल्लादी कृष्णस्वामीअय्यर
(३) सदस्य – एन.गोपालस्वामी अय्यंगार
(४) सदस्य – के. एम. मुन्शी
(५) सदस्य – सय्यद मोहंम्मद सादुल्लाह
(६) सदस्य – बी. एल. मित्तल
(७) सदस्य – डी. पि. खैतान .
अशा पध्दतीने संविधान सभेने मसुदा समितीवर अध्यक्षा सहित सात सदस्य नियुक्त केले होते . त्यापैकी एकाने एकाच महिण्यात सभागृहाचा राजीनामा दिला ,
तिन महिण्याने एकाचा मृत्यू झाला ती जागा रिक्तच राहिली .
एकजण राजीनामा न देताच अमेरिकेला निघून गेला , ती पण जागा रिक्तच राहिली .
नंतर एक सदस्य राज्याच्या राजकारणात गुंतून पडला सभागृहात कधी आलाच नाही ,
त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली . दोन व्यक्ती दिल्लीपासून खुपच लांब होत्या , त्यातल्या एकाची प्रकृतीही ठीक नसायची , त्यामुळे सहा महिण्याच्या नंतर एकही सदस्य सभागृहाकडे फिरकलाच नाही .
बाबासाहेबांनी इंग्रजाना कळविले की सर्वच सदस्य गैहजरच राहतात सहा महिण्यापासून एकही सदस्य हजर नाही .
तेंव्हा इंग्रजांनी संम्पूर्ण संविधान निर्मितीची जबाबदारी बाबासाहेबांवरच सोपवली .
व ती जबाबदारी बाबासाहेबांनी उदारअंतकरणाने स्विकारली .व आठरा – आठरा तास अभ्यास करून एकट्या बाबासाहेबांनी संविधान निर्मीतीचे काम अत्यंत योग्य प्रकारे व एकनिष्ठेने २ वर्षे ११ महिने १८ दिवसात पार पाडले . या देशाचा कायदा कानून बाबासाहेबांनी लिहला ,हा देश संविधानावर चलतो . सत्ता कोणाचीही असो कायदा मात्र बाबासाहेबांचा आहे .
म्हणूनच त्यांना भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणतात .
संविधन लिखाणाचं काम चालू असतांना गांधी नेहरूं व सरदार पटेल राजेंद्र प्रसाद हे आंबेडकरांकडे आले व म्हणाले आंबेडकर साहेब तुम्ही तुमच्या स्वमताने या देशाचा कायदा बनवत आहात ठिक आहे ,
पण आमची एक कलम त्यामध्ये समाविष्ट करा ती म्हणजे या देशातल्या
ज्या नागरिकांच शिक्षण ग्रॅज्युयट असेल त्याच व्यक्तिला मतदानाचा अधिकार असावा .आणि जो व्यक्ति ग्रॅज्युयट असेल त्यालाच उमेदवारी पण दिली गेली पाहिजे .
मग ती उमेदवारी ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत असावी .
हे ऐकून बाबासाहेब त्यांना म्हणाले आज या काळात ग्रॅज्युयट किती जमाती आहेत बोटावर मोजण्या इतक्याच आहेत आमच्या SC, ST,OBC यांना शिक्षणाचा वारा सुध्दा माहित नाही निरक्षर आहेत मी त्यांना वार्यावर सोडणार नाही .
बाबासाहेबांनी गांधी नेहरूचं न ऐकता संविधानात निरक्षर व साक्षर माणसाला समान मतदानाचा व समान उमेदवारीचा आधिकार बहाल केला .
ब्राम्हणांनी लिहलेल्या मनुस्मृतीने या देशातल्या सर्व बहुजनांना हकक अधिकारापासून वंचित केले . मनुस्मृतीने ज्या ज्या बहुजनांना हक्क अधिकारापासून वंचित केले त्या सर्व बहुजनांना ” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे सर्व मानवी हक्क बहाल केले
डॉ. बी. आर. आंबेडकरांनी या भारताच संविधान लिहून
तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द, महात्मा फुले , छ. शाहू महाराज, या सर्व महामानवांच स्वप्न पुर्ण केलं…!!!
भिमजीने हमें बलवान
बना डाला ,
हटा पाए ना ओ चट्टाण
बना डाला ,
मेरे भिम के संविधान का
करिश्मा तो देखो यारों ,
एक चाय बेचने वाले को
प्रधानमंत्री बना डाला…!!!
सुरेश माघाडे
८९९९२०२१४१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्य घटनेत ३९५ कलमे व ८ परिशिष्ट्ये आहेत. आजच्या घडीला भारतीय घटनेत ४४८ कलमे, २५ भाग, १२ परिशिष्ट्ये, ५ पुरवण्या आहेत. भारतीय घटनेत वेळी प्रसंगी दुरुस्तीची तरतूद असल्यामुळे आतापर्यंत ९८ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. म्हणून काही कलमे वाढली आहेत याची नोंद घ्यावी. ही घटना लिहिण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवस लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना सहा लोक सहकारी दिले होते.
१) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर,
२) एन. गोपालस्वामी अयंगार,
३) के. एम. मुन्सी,
४) सैयद मोहम्मद सादुल्ला,
५) बी. एल. मीत्तर,
६) डी. पी. खैतान.
असे सहा लोक होते आणि सल्लागार म्हणून बी. एन. राव यांना नेमण्यात आले होते. सहा सदस्यांपैकी एक परदेशात गेला, एकाचा मृत्यू झाला. एक राज्याच्या कारभारात गुंतला होता. दोन सदस्य दिल्लीपासून दूर होते. एकाने राजीनामा दिला होता. अशा प्रकारे सहाही सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना लिहिण्यासाठी कसल्याही प्रकारे मदत केली नाही. त्यामुळे घटना लिहिण्याचे कार्य एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करावे लागले आणि त्यांनी भारतीय घटना दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द केली. ही भारतीय राज्य घटना दि. २६ जानेवारी १९५० रोजी या देशात अंमलात आली तेव्हापासुन देशात प्रजासत्ताक राज्य सुरु झाले. या भारतीय घटनेची विशिष्ट्ये
१) भारतीय राज्य घटना (संविधान) म्हणजे ज्या ग्रंथात देश कसा चालवावा या विषयी कायदे-कानुन आणि प्रत्येक घटकाचे अधिकार कर्तव्य इत्यादी गोष्टी ज्यामध्ये नमुद केले आहे त्याला ( संविधान ) भारतीय राज्य घटना म्हणतात. हा एक सामाजिक सिध्दान्त आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कोणतीही जात,लिंग, रुढी, परंपरा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवीत स्वातंत्र्याच्या आड येऊ शकणार नाही. जर तसा प्रयत्न केला तर ती व्यक्ती किती मोठी असली किंवा मोठ्या पदावर असेल तरी त्या अन्याय अत्याचार करणार्या व्यक्तीला भारतीय घटनेने दोषी ठरविले आहे आणि त्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे.
२) भारतीय राज्य घटना कधी ताठर आहे तर कधी लवचिक आहे. वेळी प्रसंगी घटनेत नवीन कायदे समाविष्ट करण्याची तरतूद आहे
३) देशात कधी आराजकता माजली तर आणीबाणी पुकारण्याची तरतूद घटनेत केलेली आहे. कारण अराजकतेमुळे देशाची वित्तहानी, प्राणहानी होते, जाळपोळ-दंगली घडतात. हे टाळण्यासाठी बंडखोर, चिथावणी घातक ठरणारी आंदोलने बंद करण्याची तरतूद घटनेत आहे.
४) भारतीय राज्य घटनेमुळे हजारो वर्षाची धर्मावर आधारलेली विषम व अमानवी समाज व्यवस्था नष्ट केली व समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवतावादी तत्त्वावर आधारित समाजव्यवस्था या भारतात स्थापन झाली आहे. एवढी समाज बदलाची ताकद घटनेत आहे.
५) भारतीय घटनेत स्त्री-पुरुष जातपात असा भेद न ठेवता सर्व व्यक्ती समाज आहेत हे भारतीय समाजाला भारतीय घटनेने शिकविले आहे. तसे कायदे व तरतूदी घटनेत समाविष्ट केल्या आहेत. आज भारतीय समाजाला व देशाला जगात आदर्श राज्य घटनेमुळे मान-सन्मान प्राप्त झाला आहे. हा देश अमानवी वर्ण व्यवस्था जातीभेदामुळे जगात आपला देश बदनाम झाला होता.
६) भारतीय राज्य घटना मानवी मुल्य जपणारी असल्याने आज जगाला मार्गदर्शन करीत आहे. या भारतीय घटनेमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सारे जग कौतुक करित आहे. जगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौध्दिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व मानवता या क्षेत्रात अग्रगण्य स्थान दिले आहे.
७) भारतीय घटनेमुळे डॉ.बाबासाहेबांचे जातीयतेविरुध्दचे कार्य आधुनिक मानवाला विषमतावादी विचारांना समतावादी विचाराकडे नेणारा प्रबोधनाचा मार्ग बनले आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगाचे गुरु बनले आहेत. युग बदलणारा, समाज बदलणारा, जग बदलाची ताकद असणारा महामानव म्हणून त्यांना जगाने पूजनीय मानले आहे.
८) भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश अनेक छोट्या छोट्या राज्यात संस्थानांमध्ये विखूरलेला होता. या देशात अनेक जाती-जमाती होत्या, अनेक धर्म पंथांमध्ये हा देश विभागला होता. आपआपसात मतभेद होते. राज्य सिमावाद होता. या वातावरणात देशात एकता आणि अखंडता, बंधुता निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेच्या माध्यमातून केलेले महान कार्य आहे. भारतात २९ घटक राज्ये, ७ केंद्रशासित प्रदेश आहेत. तसेच विविध जाती धर्माचे लोक रहात आहेत. या सर्वांमध्ये एकता निर्माण झाली ती केवळ भारतीय राज्य घटनेमुळे
९) कलम १४ नुसार भारतातील सर्व व्यक्तीस समानतेचे संरक्षण देण्यात आले आहे. जातपात किंवा वर्ग, वर्ण असा भेदभाव केला जाणार नाही.
१०) कलम १६ प्रमाणे सार्वजनिक सेवा योजनांमध्ये समान संधी देण्यात आली आहे. कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
११) कलम१७ प्रमाणे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
१२) कलम १९ ते २२ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारात भाषण स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, कुठेही संचार स्वातंत्र्य, भारतात कुठेही वास्तव्य व व्यवसाय उद्योग स्वातंत्र्य इत्यादी स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
१३) कलम २५ ते २८ नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार पूजा- अर्चा करण्याचा हक्क किंवा अधिकार देण्यात आला आहे. या कलमाने धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब समजली जाईल. कारण कोणी कोणत्या धर्माचा स्वीकार करावा व त्या धर्माचे पालन करणे अथवा प्रसार करण्याचा हक्क किंवा अधिकार भारतीय राज्य घटनेने प्रत्येक व्यक्तीला दिला आहे.
१४) शैक्षणिक क्षेत्रात सर्वाना कोणत्याही संस्थेत, संघटनेत प्रवेश देण्यात त्याचा धर्मपंथ, वंश, जात पाहिली जाऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे.
१५) कलम ३३०नुसार लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्याची तरतूद केली आहे
१६) कलम ३३५नुसार देशाच्या व राज्यात सेवामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीसाठी जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एस.सी.,एस.टी.,ओ.बी.सी. वर्गातील लोकांना नोकर्या मिळतात. त्यामुळे समाज आपली प्रगती करु लागला आहे.
१७) कलम ३३८ नुसार अनुसूचित जातीचे गार्हाणे ऐकून घेण्यासाठी व सरकारला सूचना देण्यासाठी अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाची निर्मिती करण्यासाठी सांगितले आहे.
१८) कलम ३४०नुसार भारताच्या राज्य क्षेत्रातील मागासलेला ओ.बी.सी. इतर मागासाच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या असलेल्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सहन कराव्या लागतात त्याचे अवलोकन करणे व ती स्थिती सुधारण्यासाठी व उपाय योजना करण्यासाठी आयोग नेमणे. त्या आयोगाने केलेल्या शिफारसी अंमलात आणाव्यात असे घटनेत नमुद केले आहे. त्या तत्त्वानुसार ओ.बी.सी.साठी मंडल आयोग नेमला होता. त्यानुसार ओ.बी.सीला आज २७ टक्के आरक्षण मिळत आहे.
२०) १. सार्वत्रिक प्रौढ मतदान पध्दती २. संसदीय शासन पध्दती ३. धर्म निरपेक्षता ४. सार्वभौम प्रजातंत्र प्रजासत्ताक राज्य ५. जनतेचे सार्वभौमत्व ६. नागरीकत्व आणि राज्याची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये कल्याणकारी राज्य ७. समाजवादी समाज रचना स्थापन करणे यासाठी राज्यांनी काय करावे या संबंधीच्या सूचना ही मार्गदर्शन तत्त्वे महत्वाची ठरतात समाजात शिक्षण प्रसार करणे, बेकारांना काम देणे, स्त्री- पुरुषांना समान वेतन देणे, दारूबंदी करणे, निराधारांना आश्रय दिणे, राजकीय, सामाजिक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचे व वर्गीकरण मांडण्यात आले आहे.
संविधानाने देशाचा मानवांचा उत्कर्ष विकास होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!