दिनविशेष – बुधवार दिनांक 15 मे 2024.

आज दि. १५ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, बुधवारो, वेसाख मासो, बुधवार, वैशाख माहे.
१५ मे १८४७ – रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दांपत्याने पुण्यातील महारवाड्यात अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली.
१५ मे १९१५ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दररोज अठरा (१८) तास अभ्यास करून ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाला एम. ए. च्या पदवीसाठी सादर केला.
१५ मे १९३६ – रोजी लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या परिषदेसाठी तयार केलेले भाषण, त्यातील वेद व हिंदू धर्मावर टीका असल्याने नामंजूर करत मंडळाने परिषदच रद्द केली, ॲनिहीलेशन ऑफ कास्टस हे न झालेले भाषण विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक रुपाने प्रकाशित केले.
१५ मे १९३७ – रोजी अमरावती येथे विद्यार्थी संमेलनाचे अध्यक्षपद कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भूषविले.
१५ मे १९३८ – रोजी देवरूख येथे शेतकऱ्यांच्या सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे.”
१५ मे १९४५ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टाईम्स ऑफ इंडिया पत्रातील अग्रलेख आणि ठक्कर बाप्पांच्या पत्राला उत्तर लिहिले. त्याचा वृत्तांत २६ मे १९४५ च्या जनता वृत्तपत्रात प्रकाशित झाला.
१५ मे २००४ – रोजी अनेक पुरस्कार संन्म्मानित आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते, शाहीर, महाकवी वामन तबाजी कर्डक उर्फ वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दहा हजार पेक्षाही जास्त गीते रचली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत