खंड प्रकाशनात समिती सदस्यांनाच डावलले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचण्यासाठी उत्सुक असलेल्यांच्या पदरी यंदा निराशा पडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अप्रकाशित साहित्याचा 23 वा खंड तयार होता. मात्र मंत्रीमहोदयांची तारीख मिळत नसल्याने प्रकाशन रखडले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात मंगळवार, 3 ऑक्टोबरला केवळ डझनभर लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेंबाच्या या साहित्याचे प्रकाशन होणार आहे. मात्र या प्रकाशन सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या सदस्यांना डावलण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. समिती सदस्यांच्या वॉट्सअॅप ग्रुपवर केवळ प्रकाशनाची सूचना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे, हे विशेष मागील 2021 मध्ये नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती गठित झाल्यानंतर प्रथमच बाबासाहेबांच्या अप्रकाशित साहित्याचा स्वतंत्र खंड प्रकाशित होणार आहे. यामुळे वाचकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र या प्रकाशन सोहळ्यापासून समिती सदस्यांना डावलण्यात आले असल्यामुळे सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकाशन समितीमध्ये माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर, एन. जी. काबंळे, डॉ. मधुकर कासारे, प्रा. रणजित मेश्राम, प्रज्ञा दया पवार, सुषमा अंधारे, केवल जीवनतारे यांचा समावेश आहे. मात्र यांना निमंत्रणच मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
बाबासाहेबांनी 1921 मध्ये एमएस्सी पदवीसाठी लंडन विद्यापीठाला सादर केलेला ‘डिसेंट्रलायझेशन ऑफ प्रोव्हिन्सल ऑफ इम्पिरिअल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ हा प्रबंध ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांच्या मदतीने समितीला प्राप्त झाला. यानंतर या खंडावर समिती सदस्य सचिवांनी काम केले. सहका यांनी सहकार्य केले. हा प्रबंध लंडनच्या सिनेट ग्रंथालयात होता. या खंड 2 ला समितीने प्रकाशनाची मान्यता देण्यात आल्यानंतर समितीच्या उदासीन धोरणामुळे हा खंड प्रकाशित होऊ शकला नाही. अलीकडे या खंडाचे प्रकाशन होणार आहे
खंड प्रकाशनासाठी फार पुर्वीपासून प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती. अखेर 27 सप्टेंबरला रात्री समिती अध्यक्ष असलेल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचे पत्र आले. त्यांनी प्रकाशन ठिकाण, वेळ कळविले. एवढया घाईत प्रकाशन होणार असल्याने सदस्यांना माहितीसाठी पत्र पाठविले. मुंबईतील सदस्यांना येणे शक्य असल्याने त्यांना विनंती केली. इतर सदस्यांना माहिती दिली. खंड प्रकाशन होणे महत्वाचे आहे. डिसेंबर, जानेवारीत प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम होईल.-
-डॉ. प्रदिप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत