देशमहाराष्ट्रमुख्यपान
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान शहीद.

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान शहीद झाले.
राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. त्यात लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले असून, एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाला. जखमींना उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत